तुम्ही जेव्हा निराश असाल तेव्हा एखाद्या मुष्टियोद्ध्याप्रमाणे विचार करा. तुम्हाला चीत केले असेल, तर जास्तीत जास्त १० सेकंदांमध्ये उठून उभे राहणे गरजेचे असते. एखादा सेकंद अधिक लागला तर खेळ खलास झालेला असतो. तुम्हाला एक उत्तम नेता व्हावेसे वाटते? स्वतःचा व्यवसाय सुरू करावासा वाटतो? तुमच्या मुलीने तिच्या अंगभूत गुणांचा सर्वाधिक विकास करावा असे वाटते? वरीलपैकी एका प्रश्नाचे जरी ‘होय’ असे उत्तर असेल, तर ‘सवय जिंकण्याची’ हे पुस्तक खास तुमच्यासाठी आहे. हे एक असे पुस्तक आहे की जे तुमची विचार करण्याची, काम करण्याची, एवढंच काय तर जगण्याची रीत बदलेल, नक्की. आत्मविश्वास आणि चिकाटीच्या कथांमधून तुम्हाला प्रेरित करेल. नेतृत्वगुण आणि संघभावनांचा विकास करेल अशा कथा ज्या तुमच्या मनात ध्येय आणि
निश्चयाचे स्फुल्लिंग चेतवतील. यामधील कथा कोला युद्धापासून क्रिकेट हिरो, मिशेल ओबामांचे व्यवस्थापन कौशल्य ते महात्मा गांधींचा उदारपणा, इतक्या विविध विषयांमधून लीलया प्रवास करतात. बेडूक, ससे, शार्क आणि फुलपाखरे यांच्याकडून जीवनाचे धडे देतात. या मंथनातून तुमच्यामधील विजेता नवविचारांचा अमृतकुंभ घेऊन वर येईल.
“जगातील प्रत्येक संस्कृती आपले विचारधन कथांच्या माध्यमातून पुढील पिढीला देत असते. प्रकाशने याच पद्धतीचा सहज सोप्या पण प्रभावी पद्धतीने वापर केलेला दिसून येतो. आयुष्य निर्णायक व आनंदी करण्याचे विचार तुमच्यापर्यंत पोचवण्याचा सुरेख मार्ग त्याने निवडला आहे.” समीर बोरा, IIM अहमदाबाद, डायरेक्टर
“प्रत्येक नवीन मॅनेजरसाठी अत्यावश्यक.”
– पी. एम. सिन्हा, माजी CEO पेप्सिको इंटरनॅशनल : साऊथ एशिया
एका सर्वोत्तम मॅनेजरच्या भूमिकेत दीर्घकाळ कैद राहिल्यानंतर त्यामधूनच एक उत्तम लेखक जन्माला आला आहे. त्याच्याकडे उत्तम विचारांची बीजे आहेत, जी तो तुमच्या मनात पेरेल. हे लिखाण वाचा. त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करा आणि मग त्या बीजांमधून वृक्षांची राई उभी राहिलेली तुम्ही अनुभवाल. या विचारांची तुम्ही पूजा कराल. – हर्ष भोगले
Reviews
There are no reviews yet.