दुर्दम्य इच्छाशक्ती, यशस्वी होण्याची प्रबळ इच्छा आणि स्वहितापलीकडे जाऊन समाजासाठी काहीतरी करण्याची मनोमन इच्छा यांना प्रज्वलित करण्याची क्षमता या पुस्तकात आहे. त्यामुळे प्रत्यक्ष कृती करण्याकडे आपली पावले वळतात.
– नंदकुमार दुराफे
विभागीय व्यवस्थापक, टाटा मोटर्स
कुठल्याही परिस्थितीशी सामना करताना आपल्याकडे नेहमी दोन पर्याय असतात,
१. माझी सद्यःस्थिती… परिस्थिती अशी आहे ‘म्हणून’ आहे.
२. माझी सद्यःस्थिती… परिस्थिती अशी आहे ‘तरी सुद्धा’ मी बदलू शकतो.
बहुतांश लोक पहिला पर्याय निवडून आयुष्यभर आहे तिथेच राहतात, तर काही दुसऱ्या पर्यायाच्या आधारे गरुडभरारी घेतात; पण असे लोक इतरांच्या मदतीची वाट न बघता स्वयंप्रेरित होऊन स्वसामर्थ्याने स्वतःचा उद्धार करतात. मग ती स्वयंप्रेरणा असते तरी काय? ती कशी निर्माण होते? तिच्या मदतीने यशोशिखरावर कसे पोहोचता येते, याविषयी जाणून घ्या या पुस्तकातून. अशा असामान्य कर्तृत्वाच्या कथा आपल्याला प्रेरित करतील.
दुसरा पर्याय निवडण्यास प्रवृत्त करणारे हे पुस्तक प्रत्येक सामान्य व्यक्तीला प्रामाणिक प्रयत्नांच्या जोरावर यशोशिखरावर पोहोचण्यास मदत करेल. तेव्हा या पुस्तकाच्या साह्याने स्वतःला प्रेरित करा आणि स्वतःच्या आयुष्याचे शिल्पकार व्हा.
Reviews
There are no reviews yet.