मोठ्या विश्वासानं तुम्ही पुस्तक हातात घेतलं आहे आणि ते वाचायचं देखील ठरवलं आहे.
तुमच्या मनातल्या या विश्वासाकडे क्षणभर निरखून पाहा, या विश्वासाच्या अंतरंगात लपवलेली ‘आशा’ तुम्हाला जाणवू लागेल.
जसा विश्वास वाढत जाईल, तशी आशाही वाढत जाईल. मित्र हो,
तुमच्या मनाला गवसलेला विश्वसाचा हा सूर आणि आशेचं गाणं कायम ठेवा.
पुस्तक वाचता वाचता तुम्ही म्हणाल किती सोपं आणि सहज वाटतं नाही निराशेवर मात करणं!
ते वाचायला जितकं सहज आणि सोपं वाटतं तसं प्रत्यक्षात आणणं शक्य होईल का?
जे कळतंय ते वळेल का? जे समजलंय ते उमजेल का? विचारांचं रूपांतर आचारात होईल का?
मित्रहो, या सर्व प्रश्नांची उत्तरं होकारार्थी आहेत. त्यासाठी या पुस्तकाद्वारे काही व्यावहारिक सूचना मांडणारा आहे.
पुस्तक वाचून करावयाच्या स्वाध्यायाची माहिती देणार आहे. तुम्ही देखील पुस्तकाचे मन लावून वाचन करा.
त्यातील मुद्द्यावर चिंतन करा. याच उपस्थित केलेल्या मुद्द्यांची सहकारी किंवा साथीदाराबरोबर चर्चा करा.
त्यांचं मत आजमावा आणि निराशेवर मात करण्याचा प्रयत्न करीत राहा.
Reviews
There are no reviews yet.