मित्र-मैत्रिणींनो! हे पुस्तक आज तुमच्या हाती आहे, हे पुस्तक तुमच्यापर्यंत आणण्याचा उद्देश साध्य झालाय हे तुमच्या विश्वासावरूनच समजतेय, तुमच्यात आत्मविश्वास आलाय. विक्रमी सूत्रसंचालनावरील पुस्तकानंतर वत्तृत्वकलेची शास्त्रशुद्ध माहिती देणारे एक पुस्तक असावे असे असंख्य वाचकांनी सांगितले. म्हणूनच हे प्रयोजन. ‘साकेत’च्या खजिन्यातील हे पुस्तकही तुम्हाला आवडेल असेच आहे. दर्जेेदार छपाई आणि आकर्षक मांडणीने परिपूर्ण या पुस्तकाचा तुम्हाला भाषणकलेत प्रावीण्यासाठी उपयोग होईल ही खात्री आहेच.
पण फक्त हे पुस्तक वाचून सगळं काही होणार नाही; सराव, अभ्यास आणि अन्य वक्त्यांचे निरीक्षण यातून या साधनेला फळ येईल. त्यात सराव महत्त्वाचा, सोबतच तुमचे वाचन आणि प्रसंगी टिपण-टाचण तयार करणे अनिवार्य आहे. विषय कोणताही असो, तुम्ही आत्मविश्वासाने स्टेजवर जाणार यात शंका नाही…‘बढते रहो, पढते रहो…’ भाषणकलेतील यशाचा मंत्र तुम्हाला दिलाय, तो ‘जपला’ पाहिजे. सर्वार्थाने जतन केला पाहिजे आणि जपला पाहिजे, म्हणजे त्याची आवर्तने झाली पाहिजेत.
॥ यशस्वी व्हा ॥
Reviews
There are no reviews yet.