क्रोशाकाम (Kroshakam)

Shop

क्रोशाकाम (Kroshakam)

70.00

या पुस्तकात बाहुली, दाराचे तोरण, टिपॉय मॅट यासारख्या असंख्य गोष्टी क्रोशाच्या मदतीने कशा कराव्यात याचे सविस्तर वर्णन इतक्या सोप्या भाषेत केले आहे की, ते चटकन समजते आणि त्याप्रमाणे विणकाम करता येते. या पुस्तकाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ज्यांना विणकाम येत नसेल अशा स्त्रियांना, मुलींनाही ते नव्याने शिकता यावे म्हणून सुया कोणत्या व कशा घ्यावा, दोरा कसा असावा इथपासून सुरुवात करून साखळी कशी घालावी आणि खांब कसा विणावा हे ही अगदी आकृतीसह दाखवून अगदी सोपे केले आहे.

Placeholder

70.00

Add to cart
Buy Now
Compare

आजच्या ‘फास्टफूड’च्या ‘फास्टमुव्हीज’ पिढीला एका जुन्या; पण अत्यंत आकर्षक व तितक्याच उपयुक्त कलेची माहिती देण्याचा प्रयत्न या पुस्तकात केला गेला आहे.
या पुस्तकात बाहुली, दाराचे तोरण, टिपॉय मॅट यासारख्या असंख्य गोष्टी क्रोशाच्या मदतीने कशा कराव्यात याचे सविस्तर वर्णन इतक्या सोप्या भाषेत केले आहे की, ते चटकन समजते आणि त्याप्रमाणे विणकाम करता येते. या पुस्तकाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ज्यांना विणकाम येत नसेल अशा स्त्रियांना, मुलींनाही ते नव्याने शिकता यावे म्हणून सुया कोणत्या व कशा घ्यावा, दोरा कसा असावा इथपासून सुरुवात करून साखळी कशी घालावी आणि खांब कसा विणावा हे ही अगदी आकृतीसह दाखवून अगदी सोपे केले आहे. क्रोशाच्या विणकामाचे हेच तर दोन आधारस्तंभ असतात. साखळी आणि खांब हे एकदा जमले म्हणजे विणकामाचा कोणताही नमुना फक्त पाहून सहज करता येतो.
पुस्तकाचे सर्वांत मोठे आकर्षण म्हणजे वेगवेगळ्या क्रोशा कलाकृतीचे सुंदर फोटो. ते पाहून तर स्वतःच्या बाळासाठी किंवा नातवंडासाठी सॉक्स, बूट, टोपी, झबले, दुधाच्या बाटलीचे कव्हर, शाल या गोष्टी करण्याचा अनावर मोह होतो.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “क्रोशाकाम (Kroshakam)”
Review now to get coupon!

Your email address will not be published. Required fields are marked *

0
X