भंगार ❤️ अशोक जाधव यांचं ‘भंगार’ हे त्यांच आत्मचरित्र आहे. परंतु या पुस्तकाचा व्याप पाहता ते भटक्या गोसावी समाजाचं वस्तुस्थिती मांडणार पुस्तकं वाटतंय. पत्रा,लोखंड,बाटल्या,प्लास्टिक हे लोकांच्या उकीरड्यावर जाऊन गोळा करणं,ते भंगारवाल्याला विकणे आणि त्यावर जगणारे हे लोकं. गोसावी समाजाचं भटकं जीवन,तीन दगडांची चूल,तीन काठ्यांवर उभी पाल,भंगार गोळ्या करण्यातील मरण यातना,जातपंचायतीचा बडेजाव,स्रीचं अस्तित्वहीन जगणं.मुलांच जन्मतः नि जन्मभर वंचित जगणं.या समाजातल्या स्रीया नि मुलं मोठी झोळी घेऊन भंगार गोळा करण्याच काम करतात.भिकही मागतात.पुरुष मात्र पालात दारु पिऊन लोळून दिवस काढतात.बायका-पोरांना शिवीगाळ,मारहाण करतात. हे आत्मचरित्र वाचत असताना अनेक प्रश्न मनात उभे राहतात.इतक्या प्रतिकुल परिस्थितीत अशोक जाधवांनी स्वतःचा घेतलेला शोध,माणसास कुत्र्या,डुकराचं अन्न खायला लावणारी समाज व्यवस्था एवढी निष्ठूर कशी काय असु शकते? गोसावी समाजात जातपंचायतला असलेले महत्व. पंच म्हणजे ‘पंच परमेश्वर’. त्यांच्या जिभेवर येणारा शब्द म्हणजे कायदा.जो पैसे देईल त्याच्या बाजुने न्याय.या पंचायतीत स्रीची किंमत शून्य.स्रीवर कोणीही संशय व्यक्त करु शकतो.स्री म्हणजे पापी हे गृहीतच.नवरा मनाला येईल तेव्हा सोडचिठ्ठी देणार.जातपचांयत आपल्या मर्जीनं तिचा दंड भरुन घेऊन दुसऱ्या पुरुषाच्या स्वाधीन करणार.हे खुप भयंकर आहे. समाजाच्या जातपंचायतच्या विरोधात अशोक जाधव दंड थोपटतात,जातपंचायतची मिरासदारी मोडीत काढतात.समाजातुन पहीले पदवीधर होतात.आपल्या बहीणीलाही ते पहीली डॅाक्टर बनवतात. ते असे म्हणतात,की मी अशा समाजात जन्माला आलो होतो, की जिथल्या लोकांचं उकीरडा हेच जीवन होतं.मी उकीरड्याशेजारीच जन्मलो,तिथंच वाढलो,त्यातलं उष्टं,शिळं,इतरांनी फेकलेलं अन्न उचलून ते पोटात ढकलत,भंगार गोळा करुन,ते विकुन त्यावरच शाळेसाठी एक-एक पुस्तक-वही गोळा करत शिकत गेलो.ते शिक्षण घेणं सोपं नव्हतंच.अंधश्रद्धा,रुढी-परंपरांशी,जातपंचायतीशी लढा देत आज इथपर्यंत पोहचलो.मी गोसावी समाजातला पहीला शिक्षक. मला असं वाटतं,की भंगार गोळा करणारे हे खरे तर देशाचे खरे स्वच्छता रक्षक; पण आजही त्यांच्या वाट्याला अस्वच्छ,घाणीने बरबटलेलं,भयानक रोगांनी पिंजारलेलं जीवनच आहे. अशाही परिस्थितीवर मात करत अशोक जाधव समाजातले पहीले शिक्षक झाले.पण इतरांच काय ?आजही अशी लाखो मुलं अशा घाणीत आपलं आकाश शोधत आहेत…त्यांना त्यांच आकाश मिळेल का? हे सगळं खुपचं अस्वस्थ करणारं आहे. अशोक जाधव यांनी अल्पवयात जे कार्य केलं,त्यांनी जो संघर्ष केला त्याबद्दल त्यांच खुप सारं कौतुक नि अभिनंदन सुद्धा.असा संघर्ष कोणाच्या आयुष्यात यायला नको एवढच वाटतं हे पुस्तक वाचल्यानंतर.ज्यांनी कोणी हे पुस्तक वाचलं असेल किंवा भविष्यात वाचतील त्यांच्या मनात समाज बदलाचे अंगार फुलल्याशिवाय राहणार नाहीत.ती उर्जा या पुस्तकात पानोपानी भरली आहे;ती भविष्यात कानोकानी गेल्याशिवाय राहणार नाही एवढंच. पुनःश्च एकदा सर तुमच्या संघर्षाला कोटी कोटी सलाम..!

भंगार (Bhangaar)
समाजाच्या जातपंचायतच्या विरोधात अशोक जाधव दंड थोपटतात,जातपंचायतची मिरासदारी मोडीत काढतात.समाजातुन पहीले पदवीधर होतात.आपल्या बहीणीलाही ते पहीली डॅाक्टर बनवतात. ते असे म्हणतात,की मी अशा समाजात जन्माला आलो होतो, की जिथल्या लोकांचं उकीरडा हेच जीवन होतं.मी उकीरड्याशेजारीच जन्मलो,तिथंच वाढलो,त्यातलं उष्टं,शिळं,इतरांनी फेकलेलं अन्न उचलून ते पोटात ढकलत,भंगार गोळा करुन,ते विकुन त्यावरच शाळेसाठी एक-एक पुस्तक-वही गोळा करत शिकत गेलो.ते शिक्षण घेणं सोपं नव्हतंच.अंधश्रद्धा,रुढी-परंपरांशी,जातपंचायतीशी लढा देत आज इथपर्यंत पोहचलो.मी गोसावी समाजातला पहीला शिक्षक. मला असं वाटतं,की भंगार गोळा करणारे हे खरे तर देशाचे खरे स्वच्छता रक्षक; पण आजही त्यांच्या वाट्याला अस्वच्छ,घाणीने बरबटलेलं,भयानक रोगांनी पिंजारलेलं जीवनच आहे. अशाही परिस्थितीवर मात करत अशोक जाधव समाजातले पहीले शिक्षक झाले.पण इतरांच काय ?आजही अशी लाखो मुलं अशा घाणीत आपलं आकाश शोधत आहेत…त्यांना त्यांच आकाश मिळेल का? हे सगळं खुपचं अस्वस्थ करणारं आहे. अशोक जाधव यांनी अल्पवयात जे कार्य केलं,त्यांनी जो संघर्ष केला त्याबद्दल त्यांच खुप सारं कौतुक नि अभिनंदन सुद्धा.असा संघर्ष कोणाच्या आयुष्यात यायला नको एवढच वाटतं हे पुस्तक वाचल्यानंतर.ज्यांनी कोणी हे पुस्तक वाचलं असेल किंवा भविष्यात वाचतील त्यांच्या मनात समाज बदलाचे अंगार फुलल्याशिवाय राहणार नाहीत.ती उर्जा या पुस्तकात पानोपानी भरली आहे;ती भविष्यात कानोकानी गेल्याशिवाय राहणार नाही एवढंच. पुनःश्च एकदा सर तुमच्या संघर्षाला कोटी कोटी सलाम..!
₹200.00
Availability:Out of stock
Book Author (s):
अशोक जाधव/Ashok Jadhav
Books You May Like to Read..
Related products
-
सुभाष चंद्र गोयल (Subhash Chandra Goyal)
₹250.00Original price was: ₹250.00.₹200.00Current price is: ₹200.00. Add to cart -
अल्बर्ट आइनस्टाइन (Albert Einstein)
₹175.00Original price was: ₹175.00.₹145.00Current price is: ₹145.00. Add to cart -
नटखट…..नट-खट (Natkhat…..Nat-Khat)
₹500.00Original price was: ₹500.00.₹400.00Current price is: ₹400.00. Add to cart -
भारतीय क्रांतिकारक आणि समाज सुधारक (Bhartiya Krantikarak Ani Samaj Sudharak)
₹250.00Original price was: ₹250.00.₹205.00Current price is: ₹205.00. Add to cart -
स्वतःपलीकडची गुंतवणूक सोडवणूक (Swatapalikadachi Guntavanuk Sodavanuk)
₹175.00Original price was: ₹175.00.₹155.00Current price is: ₹155.00. Add to cart -
थॉमस एडिसन (Thomas Edison)
₹225.00Original price was: ₹225.00.₹185.00Current price is: ₹185.00. Add to cart -
आल्फ्रेड नोबेल (Alfred Nobel)
₹175.00Original price was: ₹175.00.₹140.00Current price is: ₹140.00. Add to cart -
गौतम बुद्धांचे चरित्र (Gautam Buddhanche Charitra)
₹250.00Original price was: ₹250.00.₹200.00Current price is: ₹200.00. Add to cart -
वाटेवरच्या सावल्या (Vatevarlya Savlya)
₹225.00Original price was: ₹225.00.₹185.00Current price is: ₹185.00. Add to cart -
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pantapradhan Narendra Modi)
₹350.00Original price was: ₹350.00.₹280.00Current price is: ₹280.00. Add to cart -
काजोळ (Kajol)
₹250.00Original price was: ₹250.00.₹220.00Current price is: ₹220.00. Add to cart -
महान भारतीय संत (Mahan Bhartiya Sant)
₹350.00Original price was: ₹350.00.₹290.00Current price is: ₹290.00. Add to cart -
श्री संत गाडगे महाराज (Shree Sant Gadge Maharaj)
₹100.00Original price was: ₹100.00.₹80.00Current price is: ₹80.00. Add to cart -
५१ प्रेरणादायी चरित्रकथा (51 Preranadayi Charitrakatha)
₹225.00Original price was: ₹225.00.₹185.00Current price is: ₹185.00. Add to cart -
मॅन ऑन मिशन महाराष्ट्र (Man on Mission Maharashtra)
₹350.00Original price was: ₹350.00.₹280.00Current price is: ₹280.00. Add to cart -
डॉ.अब्दुल कलाम (Dr. A.P.J. Abdul Kalam)
₹150.00Original price was: ₹150.00.₹120.00Current price is: ₹120.00. Add to cart -
उचल्या (Uchlya)
₹250.00Original price was: ₹250.00.₹195.00Current price is: ₹195.00. Add to cart -
शहिद भगतसिंग (Shahid Bhagatsingh)
₹175.00Original price was: ₹175.00.₹145.00Current price is: ₹145.00. Add to cart -
टाटा स्टोरीज (Tata Stories)
₹299.00Original price was: ₹299.00.₹245.00Current price is: ₹245.00. Add to cart -
विमुक्त भटक्यांचे स्वातंत्र्य? (Wimukta Bhatkyanche Swatantrya?)
₹225.00Original price was: ₹225.00.₹175.00Current price is: ₹175.00. Add to cart -
संत कबीर (Sant Kabir)
₹100.00Original price was: ₹100.00.₹85.00Current price is: ₹85.00. Add to cart -
वॉरन बफेट (Warren Buffett)
₹230.00Original price was: ₹230.00.₹184.00Current price is: ₹184.00. Add to cart -
धीरूभाई अंबानी (Dhirubhai Ambani)
₹150.00Original price was: ₹150.00.₹120.00Current price is: ₹120.00. Add to cart -
सर आयझॅक न्यूटन (Sir Isaac Newton)
₹150.00Original price was: ₹150.00.₹120.00Current price is: ₹120.00. Add to cart -
वंगचित्रे (Vang-Chitre)
₹250.00Original price was: ₹250.00.₹205.00Current price is: ₹205.00. Add to cart -
सत्याचे प्रयोग अथवा आत्मकथा (Satyache Prayog Athva Aatmakatha)
₹250.00Original price was: ₹250.00.₹200.00Current price is: ₹200.00. Add to cart -
संत तुकाराम (Sant Tukaram)
₹250.00Original price was: ₹250.00.₹200.00Current price is: ₹200.00. Add to cart -
रतन टाटा (Ratan Tata)
₹200.00Original price was: ₹200.00.₹178.00Current price is: ₹178.00. Add to cart -
गेम ऑफ थ्रोन्स – मराठी (Game of Thrones – Marathi)
₹200.00Original price was: ₹200.00.₹165.00Current price is: ₹165.00. Add to cart -
विश्वातील २० महान शास्त्रज्ञ (Vishwatil 20 Mahan Shastradnya)
₹250.00Original price was: ₹250.00.₹205.00Current price is: ₹205.00. Add to cart -
मिसाईल मॅन डॉ.अब्दुल कलाम (Missile Man Dr. Abdul Kalam)
₹300.00Original price was: ₹300.00.₹250.00Current price is: ₹250.00. Add to cart -
लालबहादूर: लाल बहादूर शास्त्री (Lalbahadur: Lal Bahadur Shastri)
₹70.00Original price was: ₹70.00.₹60.00Current price is: ₹60.00. Add to cart -
भारतातील महान राष्ट्रपुरुषांच्या जीवनकथा (Bharatatil Mahan Rashtrapurushanchya Jeevankatha)
₹140.00Original price was: ₹140.00.₹110.00Current price is: ₹110.00. Add to cart -
जगातील महान व्यक्ती (Jagatil Mahan Vyakti)
₹120.00Original price was: ₹120.00.₹100.00Current price is: ₹100.00. Add to cart -
भारतरत्न विजेते शास्त्रज्ञ (Bharatratna Vijete Shastradnya)
₹100.00Original price was: ₹100.00.₹85.00Current price is: ₹85.00. Add to cart -
सम्राट चंद्रगुप्त मौर्य (Samrat Chandragupt Mourya)
₹150.00Original price was: ₹150.00.₹120.00Current price is: ₹120.00. Add to cart -
आनंदयोगी पु. ल (Aanandayogi Pu.La)
₹100.00Original price was: ₹100.00.₹80.00Current price is: ₹80.00. Add to cart -
मंतरलेले दिवस (Mantarlele Divas
₹250.00Original price was: ₹250.00.₹205.00Current price is: ₹205.00. Add to cart -
सावित्रीबाई फुले (Savitribai Phule)
₹150.00Original price was: ₹150.00.₹125.00Current price is: ₹125.00. Add to cart -
भारतरत्न (Bharatratna)
₹275.00Original price was: ₹275.00.₹225.00Current price is: ₹225.00. Add to cart
Reviews
There are no reviews yet.