मोबाईल फोन जवळ नसला तर दिवसभर चुकल्या चुकल्या सारखे वाटते, याचा अनुभव प्रत्येकाने एकदा तरी घेतलेला असतो. आज मोबाईल बहुतेकांच्या जीवनाचा भाग बनलेला आहे. मात्र काही वर्षांपूर्वी कुठूनही कोणाशीही संवाद साधण्याची संकल्पना आपल्या गावीही नव्हती. बिनतारी संदेशवहनाच्या प्रगतीमुळे आज मोबाईलचे कार्य, त्याच्या शोध, विद्युत चुंबकीय लहरी, विजेची निर्मिती, चुंबक, आणी वीज यांचा संबध, अशा तंत्रज्ञानाचा शोध लावणारे शास्त्रज्ञ, संदेशवाहक उपकरणे, त्यांची स्मार्टफोनपर्यंतची क्रांती याचा मागोवा अतुल कहाते यांनी बखर मोबाईल फोनची मधून घेतला आहे. मोबाईलमुळे दुनिया मेरी मुठ्ठी में. असल्यासारखे वाटते. अशा या फोनचा इतिहास रंजक आणी सनसनाटी आहे.
Reviews
There are no reviews yet.