प्रेम स्पर्श आणि आकर्षण स्त्री-पुरूष आकर्षण हा चर्चेचा सनातन विषय आहे. स्त्री-पुरूष आकर्षण हे एक शाश्वत सत्य आहे. स्त्री-पुरूष आकर्षणात अनेक घटक समाविष्ट आहेत. स्त्री-पुरूष आकर्षणात मानवी मेंदू महत्त्वाची भूमिका बजावत असतो. स्त्री-पुरूष आकर्षणावर संस्कृती आणि परंपरा यांचाही परिणाम होत असतो. स्त्री-पुरूष आकर्षणामध्ये वस्त्रांचमहत्त्वही लक्षात घ्यावं लागतं. सर्वच पुरूष स्त्रियांकडे आणि सर्वच स्त्रिया पुरुषांकडे आकृष्ट होतात, असं नाही. ह्या अपवादांना नाकारून चालणार नाही.
स्त्री-पुरूष आकर्षणाचं कारण प्रजनन हे असलं, तरी स्त्री-पुरूष आकर्षणाची फलश्रुती टाळण्याचे प्रयत्न पूर्वापार चालत आले आहेत. स्त्री-पुरूष आकर्षणामुळ मानवी इतिहासाला वेळोवेळी नवं वळण लाभलं. हे, आणखी बरंच काही; ह्या ठिकाणी वाचायला मिळतंच, पण त्यामागचं विज्ञानही सहज कळतं. तेव्हा उघडा पान आणि करा वाचायला सुरुवात. मग तुमचं घड्याळाकडे सहजच दुर्लक्ष होईल. वाचून पूर्ण झाल्यावर परत ह्या व्यावहारिक जगात याल, ह्याची खात्री.
Reviews
There are no reviews yet.