द हिडन लाईफ ऑफ ट्रीज |(The Hidden life of Trees)

द हिडन लाईफ ऑफ ट्रीज |(The Hidden life of Trees)

जगभरात लोकप्रिय झालेल्या या पुस्तकात वोह्ललेबेन यांचे जंगल आणि वनस्पतींवरचे अपार प्रेम स्पष्ट दिसते. या पुस्तकातून सामान्य वाचकाला झाडांच्या जीवनचक्राची ओळख होते. ही जाणीव झाल्यावर जंगलातून हिंडताना आपल्याला एक वेगळाच अनुभव मिळेल, हे निश्चित.

Original price was: ₹320.00.Current price is: ₹299.00.

Original price was: ₹320.00.Current price is: ₹299.00.

Add to cart
Buy Now

Book Author (s):

पीटर वोह्लेबेन (Peter Wohlleben)

झाडांचेही सामाजिक जीवन असते हे शास्त्रज्ञांना ज्ञात होतेच. पण वोह्ललेबेन यांनी हीच गोष्ट वाचकांसमोर अतिशय सुरेख पद्धतीने मांडली आहे.
– न्यू यॉर्क टाइम्स

अद्ययावत संशोधनाचा आधार घेत एका वनरक्षकांच्या रमणीय गोष्टी वाचकाला जंगलांच्या अद्भुत दुनियेत घेऊन जातात. वनस्पतींचा संवाद कसा चालतो, ते एकमेकांची काळजी कशी घेतात याचा उलगडा वाचकांना सहज होतो.
पथदर्शक संशोधनाचा आधार घेत वनस्पतींचे जीवन हे मानवी. कुटुंबरचनेपेक्षा काही वेगळे नाही, हे पीटर वोह्ललेबेन ‘द हिडन लाईफ ऑफ ट्रीज’ या पुस्तकातून दाखवतात. जंगलातील झाडे आपल्या पिलांसोबत राहून त्यांचा सांभाळ करतात, पोषणद्रव्ये पुरवितात, त्यांच्याशी संवाद साधतात, आजारपणात शुश्रूषा करतात आणि धोक्यांची पूर्वसूचनाही देतात.
अशा सहजीवनात वाढणार्‍या समूहातील झाडे सुरक्षित असतात आणि त्यांना दीर्घायू लाभते. याउलट रस्त्यावर एकटेपणात वाढणार्‍या झाडाचे जीवन मात्र खडतर असते. जंगलात राहणार्‍या आपल्या स्वजातीयांपेक्षा त्यांचे आयुष्यही कमी असते.
जगभरात लोकप्रिय झालेल्या या पुस्तकात वोह्ललेबेन यांचे जंगल आणि वनस्पतींवरचे अपार प्रेम स्पष्ट दिसते. या पुस्तकातून सामान्य वाचकाला झाडांच्या जीवनचक्राची ओळख होते. ही जाणीव झाल्यावर जंगलातून हिंडताना आपल्याला एक वेगळाच अनुभव मिळेल, हे निश्चित.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “द हिडन लाईफ ऑफ ट्रीज |(The Hidden life of Trees)”
Review now to get coupon!

Your email address will not be published. Required fields are marked *

Books You May Like to Read..

0