र्वांत महत्त्वाची कामं करायला शिका – आजच!
आपल्याकडे “करणे बाकी” यादीतील सर्व कामं करण्यासाठी कधीच पुरेसा वेळ नसतो आणि भविष्यातदेखील नसेल.
यशस्वी व्यक्ती सर्वच काम स्वतः करण्याचा प्रयत्न करीत नाहीत.
ते सर्वांत महत्त्वाच्या कामांवर संपूर्ण लक्ष केंद्रित करण्याचे कसब शिकतात आणि चिकाटीने ती कामे पूर्ण करतात.
एक जुनी म्हण आहे – जर तुम्ही दररोज सकाळी सर्वप्रथम एक जिवंत बेडूक गिळू शकलात, तर तुम्हाला दिवसभर या गोष्टीचे समाधान राहील की, तुमच्यासोबत त्या दिवशी यापेक्षा अजून वाईट काही होऊ शकत नाही.
“बेडूक गिळणे” याची तुलना दिवसातील सर्वांत आव्हानात्मक कामाशी करा
– ज्या कामामध्ये तुमची टाळाटाळ करण्याची शक्यता सर्वांत जास्त असेल; पण कदाचित त्याचाच तुमच्या आयुष्यावर सर्वांत जास्त सकारात्मक प्रभाव पडेल.
हे पुस्तक सांगेल की तुमची सर्वांत महत्त्वाची कामे कशी संपवावीत आणि प्रत्येक दिवसाची आखणी कशी करावी.
याने तुम्ही फक्त वेगाने कामं करणेच शिकणार नाहीत तर त्याबरोबरच योग्य तीच कामे करायला शिकाल.
बेस्टसेलिंग लेखक ब्रायन ट्रेसी वेळ व्यवस्थापनाचे सर्वांत महत्त्वाचे गुपित सांगतात जे अत्यावश्यक आहे
: निर्णयशक्ती, शिस्त आणि संकल्प.
या नवीन व सुधारित आवृत्तीमध्ये ते तंत्रज्ञानाविषयी अगदी नवीन माहिती सांगतात की, तुम्ही कशाप्रकारे तंत्रज्ञानाला तुमच्या वेळेवर स्वार होऊ देऊ नये.
आजपासूनच टाळाटाळ सोडणे आणि जास्त महत्त्वाची कामे सर्वप्रथम करण्यासाठी ते व्यवहारोपयोगी पायऱ्यांविषयी विस्तृत माहिती देतात.
ब्रायन ट्रेसी हे मानवी क्षमता आणि वैयक्तिक परिणामकारकता विकासाच्या क्षेत्रात अमेरिकेतील अधिकारी व्यक्तींपैकी एक आहेत.
ते दरवर्षी अडीच लाखांहून अधिक व्यक्तींना वैयक्तिक आणि व्यावसायिक विकासासंबंधी मार्गदर्शन करतात.
ट्रेसी यांनी अनेक लोकप्रिय पुस्तके लिहिली ज्यामध्ये मॅक्सिमम अचीव्हमेंट, गोल्स आणि द 100 अॅब्सोलूटली अनब्रेकेबल लॉज ऑफ बिजनेस सक्सेस यांचा समावेश होतो.
याशिवाय त्यांचे अनेक बेस्टसेलिंग ऑडिओ प्रोग्राम्स आहेत ज्यामध्ये ‘द सायकॉलॉजी ऑफ अॅचीव्हमेंट आणि हाऊ टू स्टार्ट अॅण्ड सक्सीड इन युअर ओन बिजनेस’ हे समाविष्ट आहेत.
Reviews
There are no reviews yet.