आदिवासींविषयी आपल्याला किती माहिती असते? नागरी समाजापासून फटकून राहणारे, चित्र-विचित्र कपडे घालणारे, अपरिचित भाषा बोलणारे, आणि लिहिता वाचता न येणारे. एवढेच आपले ज्ञान सीमित. मात्र, आदिवासींची जीवनशैली, त्यांचे ज्ञान पर्यावरण आणि आरोग्य रक्षक असते, या विषयी फारशी माहिती आपल्याला नसते.
निरंजन घाटे यांनी या पुस्तकात आदिवासींच्या जीवन पद्धतीची विस्तृत माहिती दिली आहे. मानववंश शास्त्राच्या अनुषंगाने रंजकपणे, ती समोर येते. आफ्रिकेतील देश, भारत, ऑस्ट्रेलिया, दक्षिण अमेरिका आदी ठिकाणचे आदिवासी त्यांची संस्कृती, पर्यावरणपूरक जीवनशैली आणि त्यांच्या आगळ्यावेगळ्या वैशिष्ट्यांसह वाचका समोर येतात..
Reviews
There are no reviews yet.