स्त्री मनातील वेदना-संवेदना अतिशय तरलपणे मांडणाऱ्या तेलगू लेखिका वोल्गा यांच्या कथांचा वंदना करंबेळकर यांनी “राजनैतिक कथा’ या नावानं केलेला मराठी अनुवाद .
वोल्गा या वेगळ्या शैलीच्या स्त्रीवादी लेखिका आहेत. स्त्रीच्या हृदयाव्यतिरिक्त शरीराच्या इतर अवयवांनाही अस्तित्व असतं; हे अवयव तिच्या भावविश्वाशी कसे आणि किती खोलवर निगडित असू शकतात, याचं अनोखं प्रत्यंतर या कथा वाचताना येतं. एक वेगळं जग या कथांमधून बाहेर येतं. देहाशी निगडित असूनही देहापल्याड घेऊन जाणाऱ्या या कथा आहेत. देहापल्याड जाऊन स्त्रीच्या अस्तित्वाचा एक व्यक्ती म्हणून शोध घेणाऱ्या या कथा आहेत.
Reviews
There are no reviews yet.