सध्याच्या स्पर्धात्मक युगात पालक आपल्या पाल्याबाबत अधिक दक्षव जागरूकझाले आहेत.
बाहेरचे बदलते जग, मोबाइल, इंटरनेट, टीव्हीच्या आधुनिक युगातील पालकत्व आव्हानात्मक बनले आहे. विभक्त कुटुंब, नोकरी करणारे पालक, शाळाकॉलेजातील वाढती स्पर्धा या कारणांनी गतिमान झालेल्या जीवनामुळे पालकांना व मुलांना ताणतणावाला सामोरे जावे लागत आहे. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी पारंपरिक संस्कारांबरोबरच
औपचारिक शिस्तबद्ध संस्कारांचीही गरज भासू लागली आहे.
आपल्या पाल्यावर चांगले संस्कार कसे करावेत, त्याच्यातील विविध गुणविशेषांना कसा वाव मिळू शकेल आणि त्याचे व्यक्तिमत्त्व सर्वांगाने कसे विकसित होईल, हे यशस्वी पालकत्वाची गुपिते’ या पुस्तकात सांगितले आहे.
आनंददायी पालकत्व आणि शिक्षणाने आपल्या पाल्याचा सर्वांगीण विकास होईल.
Reviews
There are no reviews yet.