Description
झोंबी म्हणजे लढाई! एकाने दुसर्याशी झोंबणे. ही आहे दारिद्र्याची विद्याप्राप्तीसाठी केलेली लढाई. आनंद यादवांच्या आयुष्यातला शिक्षणासाठी त्यांनी केलेला संघर्ष म्हणजे ही आत्मचरित्रात्मक कादंबरी.
या कादंबरीत फक्त शिकण्यासाठी भोगलेल्या व्यथाच आहेत असे नाही तर दरिद्री, अज्ञानी, ग्रामीण कुटुंबाचे, भीषण दारिद्र्याचे ते विश्वरूप दर्शन आहे. लेखकाचे गाव, गावातील रितीरिवाज, निसर्ग,बापाचा आडमुठेपणा,आईचा होणारा अपरिमित छळ,लागोपाठ होणारी मुले,मुलांचे अपमृत्यू,शाळेतील प्रसंग, मास्तरांचे स्वभाव,तर्हा,गावातले उरूस,जत्रा,गांधीवधानंतर झालेली स्थिती…अशा अनेक गोष्टींचे वास्तव चित्र आहे. या कादंबरीचा आवाका खूप मोठा आहे.
झोंबी हे आत्मचरित्र कादंबरी रूपात लिहिताना आनंद यादवांनी आपली कुणी कणव करावी अशी भूमिका घेतलेली नाही. एका सहृदय चिंतनशील माणसाने आपल्या बालपणी भोगलेल्या व्यथा इथे शब्दरूप केलेल्या आहेत.
वाचकांना अस्वस्थ करण्याचं प्रचंड सामर्थ्य या कादंबरीत आहे.
दारिद्र्याचे श्रीमंत चित्रण करणारी कादंबरी.
Reviews
There are no reviews yet.