Description
प्रसिद्ध लेखक विश्वास पाटील यांची साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित ही कलाकृती प्रखर वास्तव समोर आणते. धरण होयाच्या घटनेभोवती फिरणाऱ्या आयुष्याची, क्रियाप्रतिक्रियांची ही व्यापक कहाणी आहे. दहा-पंधरा वर्षांच्या काळातील, प्रदेशातील आणि मानवी जीवनातील बदल कादंबरीत टिपले आहेत. धरण, धरणग्रस्त, समाज, संघटना, राजकारण आदींचा वेध कादंबरीने घेतला आहे. धरण बांधले जाते, तेव्हा गाव विखरून जाते. गावात राहणारी माणसं विस्थापित होतात. तेव्हा त्यांचे काय होते, त्यांची मानसिक अवस्था कशी असते, पुनर्वसनातही राजकारण कसे येते आणी या सगळ्या माणसाचे जगणे कसे येते स्वस्त होऊन जाते, याचे सूक्ष्म दर्शन पाटील यांनी कादंबरीतून घडविले आहे.
Reviews
There are no reviews yet.