यशस्वी उद्योग व्यवसायाची सूत्रे (Yashasvi Udyog Vyavsayachi Sutre)

यशस्वी उद्योग व्यवसायाची सूत्रे (Yashasvi Udyog Vyavsayachi Sutre)

या जगातीलच नव्हे, तर या विश्वातील सर्वकाही फक्त विचारांमुळे घडत असते. म्हणून उद्योग-व्यवसायात यश मिळविण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या विचारांची ही शिदोरी संकलित केली आहे. उद्योग-व्यवसाय सुरू करण्यापासून त्यात यश मिळविण्यापर्यंत प्रत्येक पातळीवर हमखास उपयुक्त ठरणारे विचारांचे सुवर्णकण.

Original price was: ₹150.00.Current price is: ₹125.00.

Placeholder

Original price was: ₹150.00.Current price is: ₹125.00.

Add to cart
Buy Now

Book Author (s):

प्रतिमा भांड (Pratima Bhand)

आता जग बदलले आहे. खुले आर्थिक धोरण, मुक्त बाजारपेठ आणि माहिती तंत्रज्ञानाचा स्फोट यामुळे आता प्रगतीच्या वाटा सर्वांसाठी खुल्या झाल्या आहेत. त्यामुळे देशात आणि सर्व जगात व्यवसाय आणि प्रगती करण्याच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. उद्योग-व्यवसाय सुरू करणे आणि त्यात उच्च दर्जाचे यश मिळविणे कुणालाही शक्य आहे. । उद्योग-व्यवसायात यश मिळविणे अशक्य नसते. जाणीवपूर्वक आणि ठरवून थोडे-अधिक परिश्रम, तसेच धाडस केल्यास उद्योग-व्यवसायातच काय; पण कोणत्याही क्षेत्रात यश मिळविणे शक्य आहे. हे जीवनच मुळी यशस्वी होण्यासाठी असते. त्यासाठी आत्मविश्वास, ठाम निर्धार आणि कठोर परिश्रम याच्या जोडीला चांगले पोषक विचार हवे असतात. जीवनातील कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी लागणारे असे पोषक विचार जाणीवपूर्वक या पुस्तकात संकलित केले आहेत. या सर्व विचारांचे मनन, चिंतन आणि पठण करून यशस्वी उद्योजक आणि व्यावसायिक होणे कुणालाही शक्य आहे.
कोणत्याही यशाच्या आणि कर्तृत्वाच्या मुळाशी विचारच असतात. या जगातीलच नव्हे, तर या विश्वातील सर्वकाही फक्त विचारांमुळे घडत असते. म्हणून उद्योग-व्यवसायात यश मिळविण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या विचारांची ही शिदोरी संकलित केली आहे. उद्योग-व्यवसाय सुरू करण्यापासून त्यात यश मिळविण्यापर्यंत प्रत्येक पातळीवर हमखास उपयुक्त ठरणारे विचारांचे सुवर्णकण!

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “यशस्वी उद्योग व्यवसायाची सूत्रे (Yashasvi Udyog Vyavsayachi Sutre)”
Review now to get coupon!

Your email address will not be published. Required fields are marked *

Books You May Like to Read..