जीवनात यशस्वी व्हायला कुणाला आवडत नाही? पण त्यासाठी प्रत्येकाला अथक प्रयत्न आणि जिद्दीची कास धरावी लागते. न डगमगता आत्मविश्वासाने वाटचाल करावी लागते. यश मिळवताना कितीही अडचणी किंवा समस्या समोर आल्या, तरीही घाबरुन न जाता निश्चियाने जो पुढे जातो, तोच यशस्वी होतो.
दृढ संकल्प(अतूट निश्चय) हाच एक मुख्य गुण आहे, ज्यामुळे अनेक व्यक्ती मोठी कामे करून दाखवू शकतात. त्यांच्यात भलेही दुसरे गुण नसतील, त्यांच्यात कदाचित इतर दुर्गुण असतीलही; परंतु अतूट निश्चय, सतत संघर्ष, सराव आणि वेगळे साहस यांच्या आधारावर ते नक्की विजयी होतात. कठोर परिश्रमामुळे ते कधी निरुत्साही होत नाही, कष्ट करायला ते कधी घाबरत नाहीत. संकटामुळे ते कधी निराशही होत नाहीत. ते वारंवार प्रयत्न करत राहतात, कितीही संकटे आली तरी ते त्यांच्या मार्गावर पुढे पुढेच जात राहतात. कारण, आपल्या ध्येयासाठी सतत काम करत राहणे त्यांच्या स्वभावाचे अनिवार्य अंग असते.
प्रस्तुत पुस्तकात नेहमी प्रगती करण्यासाठी एकाहून एक सरस मार्ग सांगितले आहेत. विजयाचा संकल्प, संधीचे सोने, शक्तींचे भांडार, विनम्रता, दृढविचार, साहस, भाषणकौशल्य, स्वावलंबन इ. अशा प्रगतीच्या अनेक पायर्यांचा आपण वापर केल्यास आपल्याला निश्चितच यशप्राप्ती होईल. म्हणूनच जीवनात कधीही न थांबता यशाच्या दिशेने पुढे चला, चालतच रहा…!
Reviews
There are no reviews yet.