Description
भारताच्या आर्थिक दृष्ट्या अत्यंत मागासभागांमध्ये सुधा मूर्ती यांनी भटकंती केली आहे. त्या पायी फिरल्या आहेत, त्यांनी बसनंही प्रवास केला आहे. या भागात अठराविश्र्वे दरिद्र्यात राहणार्या माणसांच्या दारात आरोग्याच्या आणि शिक्षणाच्या सुविधा नेऊन पोचवण्यासाठी त्यांनी आटोकाट प्रयत्न केले आहेत. त्यांच्या या कार्यामुळेच समाजाच्या विविध स्तरांतील असामान्य व्यक्तिंच्या सहवासात त्या आल्या. मग ते मुंबईतून उठून जाऊन भूकंपग्रस्त गुजरातमध्ये स्थायिक होणारं भिकार्याचं कुटुंब असो, हुंड्यासाठी बळी गेलेल्या एका तरुणीची माता असो… नाही तर मोठ्या रकमेचा चेक देणगी म्हणून पाठवणारा अनामिक दाता असो… या सर्वांमुळे, त्यांच्या हृदयाला स्पर्श करून जाणार्या कहाण्यांमुळे आणि त्यांच्या मुलखावेगळ्या जीवनविषयक तत्वज्ञानामुळे सुधा मूर्तीचं जीवन समृध्द होऊन गेलं आहे. एक प्राध्यापिका आणि एक समाजसेविका या दोन्ही नात्यांनी त्यांना जे काही विलक्षण अनुभव आले ते त्यांनी आपल्यापुढे मांडले आहेत. विनोदाची झालर असलेल्या त्यांच्या घरगुती, मनमोकळ्या लेखणशैलीतून निर्माण झालेलं हे पुस्तक सुधा मूर्ती यांचं कार्य आणि त्यांचं जीवनविषयक तत्वज्ञान यांचं व्यापक दर्शन घडवणारं आहे.’Wise and Otherwise’ is Marathi translation of the English Book `Wise and Otherwise’ by Sudha Murty.
इन्फोसिस फौंडेशनच्या अध्यक्षा, एक शिक्षिका आणि सुगृहिणी असलेल्या सुधा मूर्ती ह्यांच्या ह्या लेखनाला प्रस्तावना लिहितांना ‘द न्यू इंडियन एक्सप्रेस’चे संपादकीय सल्लागार टी. जे. एस. जॉर्ज ह्यांनी म्हंटले आहे, “कन्नड भाषेत श्रेष्ठ दर्जाचं लेखन सातत्यानं करत असणार्या या लेखिकेने ‘द न्यू संडे एक्सप्रेस’ या इंग्रजी वृत्तपत्रातून प्रथमच स्तंभलेखन केलं. पंधरा दिवसांनी प्रसिद्ध होणार्या या मालिकेतून त्यांनी स्वत:चे वैयक्तिक अनुभव मांडले. आपण केलेल्या प्रवासाविषयी लिहिलं आणि त्यांना भेटलेल्या असामान्य मनाच्या सामान्य माणसांविषयी सांगितलं. त्यांच्या स्तंभलेखनामधील प्रांजळपणा आणि ताजेपणा लोकांना स्पर्शून गेला व त्याचं लेखन लोकप्रिय झालं’ – असे हे ‘तिकडच्या’ वाचकांना आवडलेले लेखन ‘इकडच्या’ वाचकांनाही आवडेल हे जाणून लीना सोहोनी ह्यांनी खुद्द लेखिकेनेही समरसून दाद द्यावी इतक्या समरसतेने मराठीत अनुवादित केले आहे.
Reviews
There are no reviews yet.