Description
वाट तुडवताना’ हे रूढ अर्थाने आत्मकथन आहे; पण आत्मचरित्राची समग्रता त्यात नाही. अर्थात लेखकालाही ते अभिप्रेत नाही. श्री. उत्तम कांबळे यांच्या विद्याजीवनाची जडणघडण ज्यातून कळते, असे हे विशिष्ट क्षेत्रीय आत्मकथन आहे. …..
…. या विद्याजीवनाचे दोन पदर आहेत. एक : औपचारिक शिक्षणाचा व दुसरा : ग्रंथप्रेमाचा. याचीच परिणती पत्रकार, लेखक, संपादक, वक्ता, तत्त्वचिंतक, संघटक, पुरोगामी चळवळीतील कार्यकर्ता वगैरे होण्यात झालेली आहे. विद्याजीवनाचा हा समृद्ध आविष्कार आहे. जन्मवंश आणि विद्यावंश, अशी विभागणी करून माणसाच्या आत्मचरित्राचा विचार करावा लागतो. सामाजिक संरचनेमुळे असा विचार करणे भाग पडते, हे उघडच आहे. काही व्यक्तींच्या बाबतीत जन्मवंश आणि विद्यावंश यांच्यात एकध्रुवीय एकात्मता आढळते, तर काहींच्या बाबतीत द्विध्रुवात्मक विरोध आढळतो. श्री. कांबळे यांच्या संदर्भात हा विरोध स्पष्ट आहे. सात पिढयांमध्ये कोणी शाळेची पायरी न चढलेल्या जन्मवंशात कांबळे यांचा जन्म झालेला. अठराविश्वे दारिद्रयाचा मिट्ट काळोख भोवती दाटलेला. सामाजिक संरचनेत प्रत्येक क्षेत्रात अधिकारवंचितता, ही या जन्मवंशाची काही परिमाणे आहेत. वडील जरी मध्य प्रदेशातील सागर येथे महार रेजिमेंटमध्ये शिपाई होते, तरी ते निरक्षरच होते. दारिद्रयातला संसार चालवताना ईला फारच कसरत करावी लागायची. दहा पैशांचे गोडे तेल आणि एका आण्याची तूरडाळ ती दोन वेळा पुरवायची. एक दिवाभर रॉकेल दोन रात्री वापरायचे, डोक्याला लावायचं तेल, पाचशे एक ब्रॅंडचा साबण वर्षातून एखाद्या दिवशी सणावाराला दिसायचा.
Reviews
There are no reviews yet.