Description
रात्र आणि उत्तररात्र हया कवितासंग्रहातील रॉय किणीकरांच्या छोटयाशा कवितांमध्ये एक खोल गूढता झाकलेली जाणवते हयात नवल नाही. कारण मुळात रॉय किणीकरांचे व्यक्तिमत्वही तसंच गूढ होते. आयुष्यामध्ये त्यांनी अनेक क्षेत्रात मनस्वी संचार केला. अनेक गोष्टींचा तळ शोधला पण चटकन जाणवावा असा मागमूस मात्र कुठंच ठेवला नाही. काळया जाकिटाच्या खिशात एक हात कोंबून कुठेही हिंडताना किणीकर दिसत.
Reviews
There are no reviews yet.