Description
सामान्य माणूसच नव्हे तर भल्याभल्या विचारवंतांची मती गुंग व्हावी असा हा काळ आहे. अशा स्थितीत ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर यांच्या लेखांचा संग्रह ‘त्रिकालवेध’ हे पुस्तक महत्वाचे ठरते. या पुस्तकात त्यांनी आजच्या काळातील समस्यांना हात घातला आहे. यामुळे जरी समस्यांची उत्तरे सापडत नसली तरी, समस्या काय आहेत त्यांच्या मागे कोणता इतिहास उभा आहे याचा वाचकांना अंदाज येतो.हे पुस्तक म्हणजे केतकरांच्या साप्ताहिक सदराचे ग्रंथरूप होय. यात प्रकाशित झालेल्या लेखांचा फोकस भविष्यवेध आहे. भविष्य योग्य प्रकारे समजून घ्यायचे असल्यास इतिहास आणि वर्तमान व्यवस्थित माहिती पाहिजे. म्हणून या लेखांत सतत ऐतिहासिक संदर्भ येतात त्याचप्रमाणे वर्तमानाचे संदर्भ येतात. अशा लेखांत एक प्रकारची पुनरूक्ती अपरिहार्य असते. या पुस्तकांत केतकरांच्या विविधांगी वाचनाचा अंदाज येतो. केतकरांना विविध सामाजिक शास्त्रांत, राजकारण, मानवी मन, इतिहासाची उत्क्रांती वगैरेत मनापासून रस असल्यामुळे त्यांचा लेखनात हे विषय वारंवार डोकावतात. हे पुस्तक आजच्या मराठी विचारविश्वात महत्वाची भर घालणारे आहे.
Reviews
There are no reviews yet.