Description
‘माझं आयुष्य मी मनापासून जगलोय, कृतार्थपणे जगलोय अपवादानं कुणाला तरी क्लेश देत, पण बहुतांश आनंदानं जगलोय. माझ्या मुठीत मावतील एवढया आनंदाच्या दाण्यांचं वाटप मी कायम करीत आलोय…. आणि तरीही माझी मूठ भरलेलीच राह्यलीय, हे माझं अहोभाग्य!माझ्या ओंजळीत जे पडलं, ते मी सुहास्य वदनानं स्वीकारलं. आणि ते बघण्यात मी इतका रमलो, की इतरांच्या ओंजळीत काय पडलं, हे बघायची मला कधी फुरसतच मिळाली नाही. ईश्र्वराकडे मागणं एकच, तू केवळ माझ्यासाठीच रचलेलं हे जीवनगान मी जर मनापासून आळवलं असेल, तर मला तू पुन्हा जीवनाकडे पाठव, पुन्हा पुन्हा पाठव आणि मला पुन्हा नटाचाच जन्म दे आणि तोही याच मराठी भूमीत दे!’नाट्यरंगभूमीवरचा कसलेला नट, नाट्यनिर्माता, दिग्दर्शक, नेपथ्यकार अन् एक छान गोष्टीवेल्हाळ ’माणूस.’ एखाद्या पट्टीच्या गायकानं ’साऽऽऽ’ लावावा आणि स्वरांना कुरवाळत, आपलंसं करत, त्यात्या स्वराला योग्य त्या कोंदणात बसवत एक अमूर्त स्वरशिल्प निर्माण करावं, तसं या पुस्तकात प्रत्येक नाटकाची जन्मकथा, त्याची निर्मिती, अडचणी, झालेले वाद, चर्चा, भांडणं, समजुती, सुखद प्रसंग या सार्यांतून ते नाटक कसं उभं राहिलं ते रसाळपणे आलं आहे. पण तरीही हे आत्मचरित्र आहे, कारण नाट्यसंसार आणि प्रत्यक्ष संसार दोन वेगवेगळे काढू न शकणार्या या अजरामर ’लखोबा’ची ही चरित्रकहाणी आहे. त्यांच्याच शब्दनाट्यांत! पट्टीचा कीर्तनकार श्रोत्यांना जसं मंत्रमुग्ध करतो, तशी ही पंतांची शैली.
Reviews
There are no reviews yet.