Description
अंधश्रद्धानिर्मुलनाचे अथक कार्य केलेले ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचेदिशादर्शक पुस्तक.अंधश्रद्धानिर्मुलनाशी संबंधित सर्व विषयांची अभ्यासपूर्ण, सखोल, तात्विक मांडणीया पुस्तकात केली आहे. वैज्ञानिक दृष्टीकोन, फलज्योतिष विज्ञानाच्या कसोटीवर, वास्तू (श्रद्धा) शास्त्राचा अर्थआणि अनर्थ, स्यूडोसायन्स अर्थात छद्मविज्ञान, मन मनाचे आजार: भुताने झपाटणे, देवीचे अंगात येणे, संमोहन,भानामती, बुवाबाजी, अंधश्रद्धा निर्मुलन समितीचा हिंदू धर्मालाच विरोध का? या प्रकरणांमध्ये डॉ. दाभोलकर यांनी आपलीभूमिका स्पष्ट केली आहे. विचार, आचार, उच्चार, संघर्ष आणि सैद्धांतिक मांडणी या पाचही आघाड्यांवरत्यांनी आणि त्यांच्या समितीने काम केले आहे. या कार्याचं आणि विचारांचं महत्व पुस्तकातून अधिक ठळक होत.तिमिरातून तेजाकडे या पुस्तकाचे तीन विभाग केले आहेत. पहिला विभाग अंधश्रद्धा निर्मुलनाशीसंबंधित थेट बाबींच्याबद्दल आहे. दुसरा विभाग सर्व बाबींच्या संदर्भात अंनिसने जीकृतीशील झुंज दिली त्याबद्दल आहे. यामुळे वैचारिक मांडणीला प्रत्यक्ष कार्याचाभरभक्कम पाया मिळतो. त्यानंतरचा तिसरा विभाग हा सैद्धांतिक आहे. अंधश्रद्धानिर्मूलनाच्या विषयाशी संबंधित जे विषय सतत चर्चिले जातात, त्यांची मांडणी केली आहे.याप्रमाणे पहिल्या विभागात वैज्ञानिक दृष्टिकोन, फलज्योतिष विज्ञानाच्या कसोटीवर, मनाचे आजार.भुताचे झपाटणे, भानामती या विषयांची सर्वांगीण मांडणी केली आहे. तर दुसऱ्या विभागात बुवाबाजीच्यासंदर्भातील ‘साहिबजदीजी करणी’, ‘कमरअली दरवेशचा चमत्कार’, ‘लंगरचा चमत्कार’, ‘गोडबाबा’,’कुशीऱ्याचा दैवी उपचार’ यांची माहिती आहे. अशा माहिती सोबतच काही रंजक व उद्बोधक घटनावाचकांना मिळतील.
Reviews
There are no reviews yet.