Description
सुनीताबाई देशपांडे आधुनिक महाराष्ट्रामधलं एक बहुचर्चित व्यक्तिमत्त्व. सर्वाधिक लोकप्रिय लेखकाची पत्नी स्वतंत्रपणे लक्षणीय लेखिका वत्सल कुटुंबिनी कर्तव्यकठोर विश्वस्त काव्यप्रेमी रसिक परखड समाज हितचिंतक आप्तेष्टांच्या आठवणींचा आणि स्वत: सुनीताबाईंच्या लेखनाचा आधार घेऊन केलेली ही स्मरणयात्रा. काही संस्मरणं नुसती रंजक नसतात, प्रेरक आणि वेगवेगळया अर्थांनी उदबोधकही ठरू शकतात.सुनीताबाई देशपांडे म्हणजे महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व पु. ल. देशपांडे यांच्या पत्नी. मात्र एवढीच ओळख ठेवून त्या वावरल्या नाहीत. लेखक म्हणून त्यांचे स्वतंत्र स्थान साहित्यविश्वात होते. पुलंना सांभाळत त्यांचे लेखनव्यवहार सांभाळणाऱ्या, प्रसंगी कर्तव्यकठोर भूमिका निभावणाऱ्या, माणसांना जोडणाऱ्या तीक्ष्ण बुद्धीच्या, तर्कशुद्ध विचार करणाऱ्या सुनीताबाई यांची समाजातील प्रतिमा वेगळी होती. मात्र, त्या मित्रपरिवार त्यांचे खरे व्यक्तिमत्व जाणून होता. पुलंच्या निधनानंतर काहीशा हळव्या झालेल्या सुनिताबाईंची ओळख मंगला गोडबोले यांनी ‘सुनीताबाई’ मधून करून दिली आहे. त्यांच्या व्यक्तीमत्वाची जडणघडण यातून कळते. त्यांचे हे स्मरण प्रेरक व उद्बोधक आहे.
Reviews
There are no reviews yet.