Description
ही कहाणी आहे नियतीने घडवून आणलेल्या एका निर्घुण अपघाताची.ही कहाणी आहे अतुलनीय मानवी धैर्याची आणि शौर्याची.ही कहाणी आहे ज्यो सिंप्सन आणि त्याचा गिर्यारोहक सहकारी सायमन थेट्सची.[पर्वत्रांगातील २१०००फूट उंचीच्या हिमशिखरावरून ज्यो खाली कोसळतो.ज्यो मृत पावला असे समजून थेट्स कॅंपवर परततो;पण ज्यो जिवंत असतो!अधू,अपंग आणि अशक्त असला तरी पर्वताच्या एका कपारीत पडलेला ज्यो जिवंत असतो.त्यानंतर सुरु होतो तो प्रवास वेदनांचा आणि अंधकाराचा….आणि या अंधकारात सतत प्रकाशमान असणाऱ्या मानवी आशेचा आणि निर्धाराचा.संकटं,निराशा,अपंगत्व आणि भय या साऱ्यांवर मात करून दोन गिर्यारोहकांनी जिवंत राहण्यासाठी दिलेल्या अभूतपूर्व लढ्याची ही चित्तथरारक कहाणी.
Reviews
There are no reviews yet.