Skip to content Skip to footer
Sale!

Shriman Yogi (श्रीमान योगी)

Author: रणजित देसाई

570.00

शिवचरित्र हे कलावंतांपुढे कालातीत राहणारे असे आव्हान आहे. कितीही काळ लोटला तरी मरगळलेल्या, हताश झालेल्या समाजमनाला खडबडून जाग आणण्याचे सामर्थ्य फक्त शिवचरित्रातच आहे.
शिवचरित्राचे भव्योदात्त उत्कट चित्रण करणारी ही कादंबरी. ”श्रीमान योगी’ ही रणजित देसाई लिखित शिवाजी महाराजांवरील चरित्र कहाणी आहे.

Additional information

Weight 1.225 g
Dimensions 20 × 14 × 4 cm
Publisher

Mehta Publishing House

Year of Publishing

32/2017

Number of pages

1151

ISBN

9788177666403

Format

Paper Book

Description

निश्चयाचा महामेरू । बहुत जनांसी आधारू ।
अखंड स्थितीचा निर्धारू । श्रीमंतयोगी ।
यशवन्त कीर्तिवंत । सामर्थ्यवंत वरदवंत ।
पुण्यवन्त नीतिवन्त । जाणता राजा ।
समर्थ रामदासांनी वर्णिलेलं शिवरायांचं हे उदात्त, दिव्यभव्य रूप म्हणजे प्रत्येक मराठी मनानं पूजलेला शक्तीरूप आदर्श.
मराठ्यांच्या किंबहुना भारताच्या इतिहासातील तेजानं लखलखणारा दीपस्तंभ.
इतका अपैलू, आवधानी संपूर्ण पुरूष इतिहासात दुसरा नाही. आदर्श राज्यकर्ता, थोर सेनानी, प्रजादक्ष, धर्माभिमानी, परधर्मसहिष्णू, चारित्र्यसंपन्न, दूरदृष्टीचा असा जाणता राजा जगाच्या इतिहासात दुसरा मिळणे कठीण.
पुरंधरच्या तहाने धुळीला मिळालेले राज्य त्याच धुळीतून परत उठवून सुवर्णमय करण्याचे सामर्थ्य फक्त या एकाच महापुरुषात होते, ही इतिहासाची नोंद आहे.
मुलगा, पती, बाप, मित्र, शिष्य इत्यादी संसारी नात्यांमधूनदेखील घडणारे या महापुरूषाचे दर्शन मन भारून टाकते.
शिवाजी ही व्यक्तिरेखा फार मोठी आहे. तिचे शेकडो पैलू आहेत. शिवचरित्र हे कलावंतांपुढे कालातीत राहणारे असे आव्हान आहे. कितीही काळ लोटला तरी मरगळलेल्या, हताश झालेल्या समाजमनाला खडबडून जाग आणण्याचे सामर्थ्य फक्त शिवचरित्रातच आहे.
शिवचरित्राचे भव्योदात्त उत्कट चित्रण करणारी ही कादंबरी.
रणजित देसाईंच्या अलौकिक प्रतिभेचं लेणं लेऊन साकार झालेली शिवछत्रपतींची ही चरितकहाणी वाचकांच्या अलोट प्रेमास पात्र ठरलेली आहे.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Shriman Yogi (श्रीमान योगी)”

Your email address will not be published. Required fields are marked *