Description
दलित समाजातील अंतर्विरोध गेल्या दशकापासून सार्या समाजासमोर ठळकपणे येत आहेत. या अंतर्विरोधाला सर्वप्रथम इथली जातिव्यवस्था कारणीभूत आहे. ती माणसामाणसात अंतर पाडते. माणसांच्या जाती निर्माण करते आणि जातींमध्ये विषमता निर्माण करते. जाती जातींमध्ये संघर्ष निर्माण करते. सर्वत्र दिसणार हे चित्र आहे. य संघर्षाचे दर्शन मला अतिशय जवळून घडले. इतके जवळून की माझ्यावरही त्याचे बरे वाईट परिणाम झाले. गेल्या दोन दशकांपासून दलितांमधील अंतर्गत राजकारणही मोठ्या प्रमाणात चर्चेचा विषय ठरते आहे. ऎक्याची भाषा होते आंइ मोडतेही. या सर्व पार्श्वभूमीवत ग्रामीण भागात, गावगाड्यात जगणार्या दलितांच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक जीवनाचा वेध घेणाचा प्रयत्न या कादंबरीत केला आहे.
Reviews
There are no reviews yet.