Skip to content Skip to footer
Sale!

Seetayan ( सीतायन )

Author: डॉ. तारा भवाळकर

220.00

लोकसाहित्याच्या ज्येष्ठ अभ्यासक डॉ. तारा भवाळकर या नेहमीच लोकसंस्कृतीचा अभ्यास मातृसंस्कृती म्हणून करत आल्या आहेत. एकूणच लोकसाहित्याची स्त्रीवादी अंगाने त्यांनी केलेली मांडणी लक्षणीय आहे. त्याच अनुषंगाने सीतेच्या वेदनेचा विद्रोहाचा जो सूर त्यांना वेगवेगळ्या लोकरामायणांत सापडला, त्याचा मागोवा म्हणजे हे सीतायन !

Additional information

Weight 250 g
ISBN

9789391547868

Number of pages

188

Year of Publishing

2023

SKU: 9789391547868 Categories: , Tags: , , , , , , , , , , , Product ID: 19635

Description

रामपत्नी म्हणून सीतेची प्रतिमा आजवर ‘सोशिकतेचं मूर्तिमंत प्रतीक
अशीच रंगवली गेली आहे. सीता सोशिक होती खरीच,
पण संधी मिळाली तेव्हा तिनेही रामाविरुद्ध विद्रोह केला.
भूमिकन्या असलेल्या सीतेने पुन्हा भूमीचा आश्रय घेणं,
हा लोकपरंपरेनं तिचा विद्रोहच मानला आहे.
अभिजन परंपरा आणि लोकपरंपरांचं नातं कायमच कधी संवादी,
तर कधी विसंवादी असं राहिलेलं आहे.
सीतेच्या संदर्भात तर भारतीय लोकमनाने कायमच
सीतेला झुकतं माप दिलं आहे. मराठी, हिंदी, कन्नड, बंगाली, बौद्ध जातककथा ते अगदी आदिवासी कथांमध्येही रामापेक्षा
सीतेचंच गुणगान गायलेलं दिसतं.
लोकसाहित्याच्या ज्येष्ठ अभ्यासक डॉ. तारा भवाळकर
या नेहमीच लोकसंस्कृतीचा अभ्यास मातृसंस्कृती म्हणून
करत आल्या आहेत. एकूणच लोकसाहित्याची स्त्रीवादी अंगाने
त्यांनी केलेली मांडणी लक्षणीय आहे.
त्याच अनुषंगाने सीतेच्या वेदनेचा-विद्रोहाचा जो सूर त्यांना
वेगवेगळ्या लोकरामायणांत सापडला,
त्याचा मागोवा म्हणजे हे सीतायन!
डॉ. मुकुंद कुळे,
लोकसाहित्याचे अभ्यासक

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Seetayan ( सीतायन )”

Your email address will not be published. Required fields are marked *