Skip to content Skip to footer

Welcome to our Publishing House!

0 items - ₹0.00 0

Shop

Sale!

Sarvottam Ravindra Pinge (सर्वोत्तम रवींद्र पिंगे)

Author: Ravindra Pinge

225.00

गेली 50 वर्षं कोऱ्या कागदाच्या शुभ्र हाकेला होकार देत, आंतरिक उर्मीनं लेखन करणारे घरंदाज लेखक. अवसान आणि आग्रह वगळून मर्मशोधक, अल्पाक्षरी, रसाळ ललित लेखन करणारे शब्दांचे विणकर. सातत्य हा त्यांचा आगळावेगळा गुण. परंतु हे सातत्य आहे अंतरीच्या आनंदाच्या झऱ्याचं! आणि म्हणून ते परत परत वाचावंसं वाटतं. रवींद्र पिंगे यांचा हा सदाबहार, ‘सर्वोत्तम’ नजराणा तुम्हां वाचकांसाठी

Additional information

Weight 360 g
ISBN

9788174343710

Number of pages

304

Publisher

Rajhans Prakashan

Year of Publishing

4th/2013 – 1st/2007

SKU: 9788174343710 Categories: , Tags: , , , , , Product ID: 19997

Description

गेली 50 वर्षं कोऱ्या कागदाच्या शुभ्र हाकेला होकार देत, आंतरिक उर्मीनं लेखन करणारे घरंदाज लेखक. अवसान आणि आग्रह वगळून मर्मशोधक, अल्पाक्षरी, रसाळ ललित लेखन करणारे शब्दांचे विणकर. सातत्य हा त्यांचा आगळावेगळा गुण. परंतु हे सातत्य आहे अंतरीच्या आनंदाच्या झऱ्याचं! आणि म्हणून ते परत परत वाचावंसं वाटतं. रवींद्र पिंगे यांचा हा सदाबहार, ‘सर्वोत्तम’ नजराणा तुम्हां वाचकांसाठीललित लेखन हा साहित्यातील बहुधा सर्वात सोपा आणि तितकाच अवघड प्रकार असावा. कोणीही उठावं आणि कोणत्याही विषयावर लिहावं आणि त्यास ललित लेखन असं लेबल चिकटवावं, असं गेली अनेक वर्ष सुरू आहे. तरीही कसदार ललित लेखकांची परंपरा मराठीत मोठी आहे. याच परंपरेतील एक भारदस्त नाव रवींद्र पिंगे असं आहे. पिंग्यांचं गेल्याच वर्षी निधन झालं. त्यापूर्वीची सलग तीन-चार दशकं ते लिहीत होते. हे काम सोपं नाही.इतका प्रदीर्घ काळ सातत्यानं वाचकांना मोहून टाकणारं लिखाण करणं, ही एक तपश्चर्याच आहे. त्याचं कारण म्हणजे कथा-कविता-कादंबरी अशा कोणत्याही राजमान्य साहित्यप्रकाराऐवजी पिंगे हे केवळ ललित लेखनच करत राहिले आणि त्यातून त्यांनी स्वत:चा असा विशिष्ट वाचकवर्ग तयार केला. पण पिंगे हे केवळ लेखकच नव्हते. तर ते एक साहित्यकर्मी होते. अनेक साहित्यिक उपक्रमांशी त्यांचा निकटचा संबंध होता आणि अनेकांना लिहितं करण्यातही त्यांचा मोठा वाटा होता. पिंग्यांनी नोकरी केली ती आकाशवाणीत. त्यानिमित्तानं त्यांचा अनेक मोठमोठ्या व्यक्तिमत्त्वांशी संबंध आला. शिवाय, पिंग्यांना प्रवासाची आवड होती आणि चांगलंचुंगलं खाण्याचीही. वाचन हा तर त्यांचा केवळ छंद नव्हे, तर त्यांच्या जीवनाचाच एक अविभाज्य घटक होता. त्यातून त्यांचं आयुष्य कमालीचं समृद्ध होत गेलं. हेच अनुभव पिंगे शब्दबद्ध करत गेले आणि त्यातून एक मोठा लेखक निर्माण झाला.

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Sarvottam Ravindra Pinge (सर्वोत्तम रवींद्र पिंगे)”

Your email address will not be published. Required fields are marked *