Description
मुलांच्या छंदांना एखादया रोपटयाप्रमाणे जपायचं असतं. रेमंडला तर जगावेगळे छंद होता… साप पाळण्याचा! भीतभीत का होईना त्याच्या आईवडलांनी त्याला रोखलं नाही… आणि रेमंडचा सर्पतज्ज्ञ डॉ. रेमंड डिटमार्स झाला. अभ्यासाच्या दॄष्टीने उपेक्षित राहिलेल्या ’साप’ या प्राण्याचा रेमंडनं त्या काळात कसून अभ्यास केला. त्यावर विपुल मौलिक लेखन केलं. निसर्ग चित्रपटांची सुंदर निर्मिती केली… ’एक होता काव्हर’ या गाजलेल्या ग्रंथाच्या लेखिका वीणा गवाणकर खास मुलांसाठी उलगडून दाखवत आहेत डॉ. रेमंड डिटमार्सचा जीवनपट… एका रसाळ आणि सुबोध शैलीत.
Ashton Porter –
Nice and comfortable!