Description
“अर्जुनाची एकूण नावे किती? यमाला शाप का मिळाला? लहानशा मुंगसाने युधिष्ठिराला कोणता धडा शिकविला? महाभारतामध्ये कुरुक्षेत्री जे घनघोर युद्ध झालं, त्यात अखेर देवदेवतांनासुद्धा कोणत्या ना कोणत्या पक्षाची बाजू घेणं भाग पडलं. युद्धाविषयी तर पुष्कळ माहिती सर्वत्र उपलब्ध आहे; परंतु या युद्धाच्या आधी, युद्धाच्या दरम्यान किंवा युद्धाच्या नंतर असंख्य कथा घडल्या आहेत. या कथांमुळेच महाभारताला रंग भरतो. या कथासंग्रहांमधून अनेक पुरस्कार प्राप्त केलेल्या लेखिका सुधा मूर्ती भारताच्या या महाकाव्याचं विस्मयकारी जग वाचकांपुढे खुलं करतात. या संग्रहाद्वारे त्यांनी सांगितलेल्या गोष्टी सर्वश्रुत नसल्यामुळेच त्यांचं हे वेगळेपण वाचकाला मंत्रमुग्ध करतं.
Reviews
There are no reviews yet.