Description
परिस्थिती बदलते. बदलत्या परिस्थितीत कसं वागणं ‘उपयुक्त’, हे बदलत जातं. माणसांच्या बाबतीत सांगायचं तर नीतीविचारही बदलतात. यात काही प्रकारचं वागणं ‘चिरंतन’ म्हणजे सगळ्याच काळांमध्ये उपयोगी ठरेल, असं असतं का? आणि अशा विचारांमध्ये आपण चांगलं-वाईट, पाप-पुण्य, सुष्ट-दुष्ट असं काही म्हणायचं? की जे जे पहावे, म्हणत चित्ती समाधान असो द्यायचं? असे विचार करणं हे तरी जगायला उपयुक्त आहे का? की नीतीबीती सब भरल्या पोटाच्या ढेकरा आहेत?
Reviews
There are no reviews yet.