Description
सखी’ पासून ‘झकासराव’ पर्यंत नऊ कथांद्वारे वाचकांना निर्मळ आनंद देणारा वपुंचा हा कथासंग्रह. ह्यात केवळ हा आनंदच मिळतो असे नाही तर जीवनाकडे कोणत्या दृष्टीने बघावे आणि आला क्षण कसा सुखद करावा ह्याचीही नकळत शिकवण मिळते. खुद्द लेखकाची अशी एक स्वच्छ दृष्टी आहे आणि हा दृष्टिकोन सहजगत्या मांडण्याचे कसब त्यांना साधले आहे म्हणून लेखकाची ‘सखी’ वाचकाचीही ‘सखी’ होऊन जाते. तसे झाल्याने लेखकाला दुस्वास वाटणे शक्यच नाही कारण तसे व्हावे म्हणून तर त्याने हा लेखनप्रपंच केला असावा ! नव्हे केला आहेच ! वपुंचे एक वाक्य आहे – “सावली देऊ शकणार्या वटवृक्षानं विश्रांतीला आलेल्या पांथस्थाला बाकीची झाडं सोडून तुला नेमका मीच सापडलो का, असं विचारायचं नसतं !”
Reviews
There are no reviews yet.