जग हे एक वैश्विक खेडे बनले आहे.
आपण कितीही नाकारले तरी इंग्रजी भाषेचा वापर ही आपल्या जीवनातील अनिवार्य बाब झाली आहे.
माहिती व तंत्रज्ञानाच्या विस्ताराने आपल्यापुढे अनेक नवीन क्षितिजे खुली केली आहेत.
इंग्लिश ही आंतरराष्ट्रीय भाषा असल्याने तिचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.
जगातला असा कोणताही देश नाही जिथे इंग्रजी शिकवली जात नाही.
आपल्या एकूण शालेय व महाविद्यालयीन जीवनात आपण १५ ते १७ वर्षं इंग्रजी शिकतो.
इंग्रजी व्याकरणाचीही आपल्याला बऱ्यापैकी माहिती असते; मात्र असे असूनही आपल्याला इंग्रजी बोलताना अनंत अडचणी येतात.
याचा विचार करताना असे लक्षात आले की, आपल्या शिक्षणपद्धतीत इंग्रजीकडे ‘भाषा’ म्हणून बघितले न जाता केवळ एक मार्क्स मिळवण्यापुरता विषय म्हणून बघितले जाते.
व्याकरणाची भीती व शब्दशः भाषांतर करण्याची पद्धत इंग्रजी संभाषणाच्या वाटेतील मोठे अडथळे ठरतात.
तेव्हा सर्वसामान्य लोकांना अचूक व प्रभावी इंग्रजी कसे बोलता येईल याचा आम्ही अभ्यास केला व हे पुस्तक तयार झाले.
व्याकरण, वाक्यरचना, रोजच्या वापरातील शब्द, संभाषणकौशल्याविषयी मार्गदर्शन अशा अनेक बाबींचे विवेचन या पुस्तकात केल्याने याला एका संपूर्ण कोर्सचे स्वरूप आले आहे. व्याकरणाबद्दलची भीती व अनास्था घालवण्यासाठी नियमांचा काथ्याकूट न करता त्यांचा वापर करून शिकण्यावर जास्त भर दिला आहे.
त्यामुळे हे पुस्तक नव्यानेच इंग्रजी शिकणाऱ्यांपासून ते इंग्रजी आवडणाऱ्यांपर्यंत सगळ्यांच्याच उपयोगी; पडेल, असा विश्वास वाटतो.
आपण या पुस्तकाचा काळजीपूर्वक अभ्यास केलात तर इंग्रजी संभाषण करण्याबाबतचा आपला आत्मविश्वास नक्कीच उंचावेल. एकदा आत्मविश्वास निर्माण झाला की, प्रयत्नपूर्वक सरावाने आपण , इंग्रजी संभाषणकौशल्य सहज आत्मसात करू शकाल.
Reviews
There are no reviews yet.