Description
सजीव
सजीवांच्या उत्पत्तीपासून ते उत्क्रांतीपर्यंत आणि बायोटेक्नॉलॉजीपासून ते जेनेटिक्सपर्यंत जीवशास्त्राचा विकास कसा होत गेला याची मनोहारी कहाणी सांगणारं आणि जीवशास्त्राचा इतिहास, त्यातल्या संकल्पना आणि त्यातल्या वैज्ञानिकांची आयुष्यं यांच्या गोष्टींची रंजक गुंफण असणारं आणि जीवशास्त्राच्या प्रचंड मोठ्या कालपटलाचा वेध घेणारा नयनरम्य कॅलिडोस्कोप म्हणजे सजीव हे पुस्तक !!
जीवशास्त्राचं हे पुस्तक अत्यंत सुस्पष्ट, सुबोध आणि सोप्या भाषेत लिहिलेलं आहे. सजीवांच्या बद्दलच्या सगळ्या संकल्पना आणि सखोल ज्ञान यात रंजक भाषेत दिलेलं आहे. जीवशास्त्राशी संबधित असलेल्या प्रत्येकानंच हे पुस्तक वाचण्यासारखं आणि संग्रहात ठेवण्यासारखं अमूल्य आहे. जीवशास्त्रातल्या ज्ञानानं झगमगून उठणारं हे पुस्तक प्रचंड यशस्वी होवो या अच्युत गोडबोले आणि अमृता देशपांडे यांना शुभेच्छा !
डॉ. राजेश शर्मा. M.Sc., M.Phil, Ph.D, SETअसोसेट प्रोफेसर अँड हेड ऑफ द डिपार्टमेंट, बायोटेक्नॉलॉजी, VPASC कॉलेज, बारामती.
सजीवांच्या अफाट जगातील अगणित सूक्ष्मजीव, वनस्पती, प्राणी यांच्या शरीर रचना, जीवनशैली, पेशी, ऊती, गुणसूत्रे, अनुवंशिकी, जैव रासायनिक प्रक्रिया त्यांचे पर्यावरणीय मूल्य आशा सगळ्याच बाबींचा घेतलेला आढावा खूप छान वाचनीय आहे. अशा रंजक विश्वाचे दर्शन घडविणाऱ्या ह्या पुस्तकाला आणि अच्युत गोडबोले आणि अमृता देशपांडे या लेखकद्वयीला खूप खूप शुभेच्छा.
डॉ. ज्योत्सा निजसुरे, M.Sc. (Botany), PhD (Zoology),
प्रोफेसर, रामनिरंजन झुंझूनवाला कॉलेज, मुंबई.
…हे पुस्तक म्हणजे शालेय विद्यार्थ्यांपासून उच्चशिक्षण घेणार्या सगळ्यांसाठी संदर्भग्रंथ तर असेलच पण कोणत्याही माणसाला जीवशास्त्राची चहुअंगी ओळख करुन करुन देणारं नितांत सुंदर मार्गदर्शक मित्रही असेल यात शंकाच नाही !
डॉ. बाळासाहेब गायकर,
चेअरमन, अॅकॅडॅमिक काऊन्सिल, पुणे विद्यापीठ, उपप्राचार्य अहमदनगर कॉलेज.
…जीवशास्त्राच्या प्रचंड मोठ्या कालपटलाचा वेध घेणारा नयनरम्य कॅलिडोस्कोप म्हणजे अच्युत गोडबोले आणि अमृता देशपांडे यांनी लिहिलेलं सजीव हे पुस्तक !!
प्रा. स्मिता वाडेकर, M.Sc., SET, GATE
माजी विभागप्रमुख, मायक्रोबायॉलॉजी, न्यू आर्ट्स कॉलेज, अहमदनगर.
Reviews
There are no reviews yet.