रवींद्रनाथ टागोरांनी भारताला साहित्याचे पहिले पारितोषिक मिळवून दिले. त्यांचा गीतांजली हा ग्रंथ विश्वसाहित्यात सर्वदूर पोहोचला. रवींद्रनाथ ह्यांनी बालकांसाठी विपूल लेखन केले आहे. त्यातील बालकविताही फार महत्त्वाच्या आहेत. रवींद्रनाथांनी आयुष्यभर लेखन केले; पण मुलांसाठी त्यांनी लिहिलेल्या ह्या कविता आणखी वेगळ्या आहेत. वयाच्या एकोसत्तराव्या वर्षी प्राथमिक शाळांच्या मुलांसाठी त्यांनी बालकविता लिहिल्या. ह्या कविता म्हणजे मुळाक्षरे शिकणाऱ्या मुलांसाठी जणू सहजपाठच आहे. श्रीमती पद्मिनी बिनिवाले यांनी केलेला हा सहज सुंदर अनुवाद चांगला उतरला आहे. रवींद्रनाथांच्या या संग्रहातील लपाछपी, रविवार, खरं सांग हं आई मजला, बाबा सततच लिहितात, वीरपुरुष, पत्र ह्या सर्वच बालकविता मुलांना आवडतील.
Reviews
There are no reviews yet.