Description
माणूस आणि प्राणी यांच्यातील अनोख्या नात्याची आगळीवेगळी गोष्ट सांगणारे डॉ. प्रकाश आमटे यांचे हे देखणे पुस्तक आहे. हेमलकशाच्या दुर्गम जंगलात जंगली प्राण्यांच्या सहवासात एक वेगळंच जगणं घडलं. त्या जगण्याची ही गोष्ट आहे. प्राण्यांनावाचवण्यात आणि वाढविण्यातला जो विलक्षण आनंद डॉ. आमटे यांनी अनुभवला तो त्यांनी या पुस्तकातून वाचकापर्यंत पोहोचवला आहे.माकड, कुत्रा, रॅटल अस्वल यांसारख्या प्राण्यांपासून बिबट्या, सिंह, सापासारखे प्राणीही या जगात गुण्यागोविंदाने राहतात भीती वाटणारे प्राणीही निरपेक्ष प्रेम दिलं तर तेवढंच निर्मळ प्रेम ते माणसांवरही करतात, हे त्यातून दिसून येतं. उत्तम छपाई आणि छायाचित्रे या पुस्तकाच्या जमेच्या बाजू आहेत…”चाळीस वर्षांपूर्वी आम्ही जेव्हा हेमलकशाला येऊन पोहोचलो तेव्हा तिथे होतं फक्त दुर्गम जंगल. आदिवासीही आमच्यापासून अंतर राखून होते. त्यामुळे आम्ही अगदी एकटे, एकाकी पडलो होतो. त्या एकटेपणातून आम्हाला बाहेर काढलं तिथे भेटलेल्या जंगली प्राण्यांनी. या प्राण्यांनी आम्हाला असा काही लळा लावला की ते आमचे मित्रच बनले. त्यांनी आमच्यावर जे निर्मळ, निरपेक्ष प्रेम केलं त्यामुळे आमचं आयुष्यच बदलून गेलं.” – डॉ. प्रकाश आमटे.
Reviews
There are no reviews yet.