Description
लोकशाही सत्ता स्थापन व्हावी म्हणून महात्मा गांधी व त्याकाळातील देशप्रेमींनी ब्रिटिशांविरुद्ध जो अहिंसेचा लढा दिला, तोच लढा आजतागायत देणाऱ्या आँग सान स्यू ची.ब्रह्मदेश हा भारताच्या अगदी जवळचा देश; पण या देशात अजूनही लोकशाही नाही. जगातील सर्वाधिक काळ हुकूमशाही सुरू असलेला देश, सर्वाधिक काळ लोकशाहीसाठी लढा सुरू असलेला देश; तसेच सर्वांत जास्त राजकीय कैद्यांना तुरुंगात ठेवणारा हा देश, ही या देशाची ओळख.त्याशिवायही ब्रह्मदेशाची अलीकडे झालेली ओळख म्हणजे आँग सान स्यू ची. अहिंसा, सत्याग्रह आणि निर्भयता या तत्त्वांचा पुरस्कार करणाऱ्या या राजबंदिनीचे चरित्र या पुस्तकात वाचायला मिळेल. अनेक वर्षे स्थानबद्धतेची शिक्षा मिळालेली स्यू ची हिला शांततेचे नोबेल पारितोषिक देण्यात आले. त्यावेळी स्यू चीचे कार्य काय याबद्दल अनेकांना उत्सुकता वाटू लागली. आँग सान स्यू चीच्या आयुष्याचा व तिच्या कार्याचा वेध घेतानाच; ब्रह्मदेशाची परिस्थिती, तिथे घडणाऱ्या घटना या सर्वांबद्दलही या पुस्तकात माहिती मिळते.
Reviews
There are no reviews yet.