मी खेड्यातून बडोद्यात आलो. राजा बनलो. नंतर शिकलो. ते शिक्षण प्रजेला दिलं. अज्ञान आपला शत्रू आहे. शिक्षणानं त्यावर मात करा. प्रजाकल्याण हाच माझा मोक्ष. देशासाठी एकी हवी. जाती-धर्मांची भांडणं सोडा. आपलं आणि देशाचं चारित्र्य निर्मल पाण्यासारखं हवं.
आम्ही ते जपलं. नियम मोडले की शिक्षा होते. दुष्काळ ही शिक्षाच आहे. पाणी मौल्यवान, ते जपून वापरा. खुळ्या चालीरीती सोडा. शिक्षणानं विज्ञानाची कास धरा. शेती-उद्योगाची काळजी घ्या. ग्रामविकास हेच राष्ट्रकार्य समजा. बलसंपन्न भारताचं माझं स्वप्न आहे. मुलांनो तुम्हीच ते पूर्ण करताल. तुम्हाला चार सूत्रं सांगतो. खूप कष्ट करा. जे काही करायचं ते प्रामाणिकपणे करा. देशप्रेम विसरू नका. प्रत्येकाशी बंधुभावानं वागा. यातूनच उद्याचा बलसंपन्न भारत घडणार आहे.
– महाराजा सयाजीराव गायकवाड
Reviews
There are no reviews yet.