Description
पूर्वी मे महिन्याची सुट्टी लागली की गावी जायचे वेध लागायचे आता कुणी सुट्टीत आपल्या किंवा मामाच्या गावी त्याअ असोशीन जात की नाही ठाऊक नाही. मला मात्र लहानपणी गावी जायच्या काही दिवस आधीच गावाकडची स्वप्न पडायला सुरूवात व्हायची. त्या स्वप्नांत गावच्या घरापासून घरातील माणसांपर्यंत आनि अंगण आवारातल्या झाडापेडांपासून गावच्या नदीपर्यंत सार काही असायच. कारण गावचा हा नजारा आईने तिच्या गोष्टींतून आणि प्रत्यक्षातही माझ्या मनात कायमचा रीजवला ह्प्ता. मी लिहिलेल्या राई मधल्या गोष्टी म्हणजे तिचीच रूजवण आहे. त्या लिहिण्याच्या निमित्ताने, मी माझच बालपणातील भावविश्व पुन्हा एकदा धुंडाळल आहे. आणि त्यातून जे हाती लागल, खरच सांगतो, त्याने मी अधिक समृध्द झालो आहे!
Reviews
There are no reviews yet.