Rahasya Vanshaveliche

Rahasya Vanshaveliche

माणसाला स्वतःविषयी आणि नव्यानं जन्म घेणाऱ्या प्रत्येकाविषयी विलक्षण कुतूहल असतं. आपल्या घरातही बाळ जन्मलं की, लगेचच ‘त्याचं नाक किती त्याच्या आईसारखं आहे ना!’ किंवा ‘अगदी आजीवर गेली आहे ही’ अशा प्रकारच्या अनेक प्रतिक्रिया यायला सुरुवात होते. या तुलना अर्थातच नव्यानं जन्मलेलं मूल आपले आई-वडील, आजी-आजोबा, काका-मामा, मावशी-आत्या अशा अनेक नातेवाइकांसारखंच असणार अशा अपेक्षांमधून होतात.

250.00

Placeholder

250.00

Add to cart
Buy Now

माणसाला स्वतःविषयी आणि नव्यानं जन्म घेणाऱ्या प्रत्येकाविषयी विलक्षण कुतूहल असतं. आपल्या घरातही बाळ जन्मलं की, लगेचच ‘त्याचं नाक किती त्याच्या आईसारखं आहे ना!’ किंवा ‘अगदी आजीवर गेली आहे ही’ अशा प्रकारच्या अनेक प्रतिक्रिया यायला सुरुवात होते. या तुलना अर्थातच नव्यानं जन्मलेलं मूल आपले आई-वडील, आजी-आजोबा, काका-मामा, मावशी-आत्या अशा अनेक नातेवाइकांसारखंच असणार अशा अपेक्षांमधून होतात. या अपेक्षांचं मूळ आनुवंशिकतेमध्ये असतं.
माणसाच्या सगळ्या गुणधर्मांचं रहस्य ‘जेनेटिक्स’ या विषयामध्ये दडलेलं आहे. जगभरात याविषयी प्रचंड मोठ्या प्रमाणावर संशोधन सुरू आहे. इथून पुढे कुठल्याही माणसाला त्याच्या वयाच्या कितव्या वर्षी मधुमेह होईल किंवा त्याला कर्करोग व्हायची शक्यता किती टक्के असेल अशांसारख्या अनेक गोष्टींच्या संदर्भातले जवळपास अचूक अंदाज व्यक्त करणं शक्य होईल. या सगळ्या गोष्टींच्या संदर्भातला इतिहास अत्यंत रंजक आहे. तसंच पूर्वीपासून आजपर्यंत या विषयामध्ये प्रगती कशी होत गेली आणि नवनवे शोध कसे लागत गेले हे समजून घेणं सर्वसामान्य वाचकाच्या दृष्टीनंसुद्धा खूप महत्त्वाचं आहे.
‘जेनेटिक्स’ हा क्लिष्ट विषय नसून तो अत्यंत सहजपणे समजून घेणं शक्य आहे असा आत्मविश्वास वाचकाला देणारं हे पुस्तक आहे.
“अतुल कहातेचं हे पुस्तक प्रत्येक माणसानं वाचलंच पाहिजे असं मी म्हणेन … जेनेटिक्समधल्या अत्यंत गुंतागुंतीच्या संकल्पना अगदी सहजपणे त्यानं मांडल्या तर आहेतच; पण शिवाय या विषयाचा पूर्वीपासून त्यानं रेखाटलेला इतिहासही अत्यंत रंजक आहे.”
– संजीव गलांडे (‘डॉक्टर भटनागर’ पुरस्कारानं सन्मानित झालेले ‘जेनेटिक्स’ विषयामधले शास्त्रज्ञ)

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Rahasya Vanshaveliche”
Review now to get coupon!

Your email address will not be published. Required fields are marked *

0