Description
मराठी साहित्यात थोडासा दुर्लक्षित असलेला साहित्य प्रकार म्हणजे रहस्यकथा.
प्रतिपश्चंद्र या पुस्तकामार्फत लेखक डॉ. प्रकाश कोयाडे यांनी मराठी साहित्याला अप्रतिम अशी रहस्यकथा देत एक उत्तम साहित्यकृती घडवली आहे. एक सायक्याट्रिस्ट डॉक्टर एका न्यायाधीशांच्या खुनाच्या आरोपाखाली अटक होतो आणि सुरू होतो एक अद्भुत, अनाकलनीय ऐतिहासिक प्रवास.
छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे गुप्तहेर प्रमुख बहिर्जी नाईक यांनी राजमुद्रेमध्ये लपवलेले एक रहस्य, जे गेल्या ३५० वर्षांपासून उजागर होण्याची वाट पाहत आहे.
शिवकालीन रहस्यमय बाबींना उजाळा देत कादंबरीचा प्रवास विजयवाडा कर्नाटकपासून सुरु होऊन वाचकांना अजिंठा लेणीपर्यंत आणून सोडतो. अचाट कल्पना शक्तीतून निर्माण झालेल्या अनेक गूढ प्रश्नांची उत्तरं म्हणजे प्रतिपश्चंद्र !
Reviews
There are no reviews yet.