प्रत्येक व्यक्तीला कधी ना कधी पाठ-कंबरदुखीच्या त्रासाला तोंड द्यावे लागलेले असते. हा त्रास टाळण्याजोगा आहे. त्याबद्दलची शास्त्रोक्त माहिती आपण मिळवली तर आपण या समस्येतून लवकर मुक्त होऊ शकतो.
शाळा-कॉलेज-क्लासेसमधील तासंतास बैठक, बँक-कार्यालय कंपन्या अशा ठिकाणचे संगणकासमोरचे बैठे काम, शारीरिक हालचालींचा व व्यायामाचा अभाव यामुळे आजकाल तरुण व्यक्तींनादेखील पाठ-कंबरदुखीचा त्रास उद्भवतो.
पाठ-कंबरदुखीच्या त्रासावर आजन्म नियंत्रण ठेवण्याकरिता तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली नियमित व्यायाम, योगासने करणे तसेच झोपणे, उठणे, बसणे या हालचाली करताना चुकीच्या सवयीत योग्य बदल केल्यास खूपच फायदा होतो. याबरोबरच आहारात योग्य तो बदल केल्यास वजन नियंत्रणात ठेवणे सोपे जाते आणि हाडांची ताकद वाढते.
हा बदल नेमका कसा करावा हे या पुस्तकात अत्यंत सोप्या भाषेत व सविस्तरपणे सांगितल्यामुळे सामान्य वाचकाला ते समजून प्रत्यक्ष करता येण्यासारखे आहे.
हे पुस्तक वाचकांना पाठ-कंबरदुखीच्या त्रासातून मुक्त होण्यास निश्चितच मदत करेल अशी अपेक्षा!
– डॉ. मंगेश पानट
Reviews
There are no reviews yet.