Description
समाजाने वेशीबाहेर ढकललेल्या आणि खर्याखुर्या स्वातंत्र्यापासून आजही वंचित राहिलेल्या पारधी जमातीची ही आक्रोशकथा आहे. त्या जमातीच्या व्यथावेदनांशी समरस होऊन त्या सग्यासोयर्यांच्या उत्कर्षासाठी झटणार्या एका तळमळीच्या हिंदुत्ववादी कार्यकर्त्याने मांडलेली ही कैफियत आहे. त्या समाजाच्या चालीरीती, पंचायतीकडून न्याय करण्याच्या नावाखाली केला जाणारा अन्याय-अत्याचार याबद्दलची वर्णने वाचून अंगावर शहारे उभे राहतात, तर संघकार्यकर्त्यांच्या पाठबळावर होत असणारे परिवर्तन पाहून अंधुकशी का होईना, पण आशाही पालवते. चित्रकथी शैलीतील हे विलक्षण प्रत्ययकारी लेखन सर्व थरांतून गौरवले गेले आहे.
Reviews
There are no reviews yet.