Description
महाराष्ट्राच्या पुढ्यात विधात्याने असे शिवधनुष्य कधीच टाकले नसेल. परक्या घुसखोराला हिंदुस्थानबाहेर हाकलून देण्यासाठी मराठी मनगटानेही या शिवधनुष्याला जिद्दीने, इरेसरीने हात घातला. मराठी पठारावरचे असे एक गाव, एक घर एक उंबरठा नव्हता; अशी एखादी जात, पोटजात, बलुता नव्हता, सारा महाराष्ट्र एकदिलाने मौजूद होता. काळाशीही चार हात करीन, प्रलयाशी झुंजता झगडता तुटेन, फुटेन पण मागे हटणार नाही. अशा निश्चयाने पानिपतचा वीर सदाशिवरावभाऊ रणात गाडून उभा राहिला. वैऱ्याचा विजयाचा आनंद विरून जावा अशी पराक्रमाची शर्थ करून पस्तीस हजार कटिल मराठी स्वारांनी पानिपतावर देह ठेवला. मराठी मातीच्या, मराठी मनाच्या सर्वोच्च सद्गुणांचा अन् दुर्गुणांचा मिलाफ झालेल्या या ऐतिहासिक रणाला नव्या अस्सल कागदपत्रांच्या आधारे जिवंत करणारी कादंबरी. ‘
पानिपतचं युद्ध ही महाराष्ट्राच्या काळजात गेली अडीचशे वर्ष रुतणारी ऐतिहासिक घटना. आणि या घटनेवरची ‘पानिपत’ ही विश्वास पाटील यांची गेली अडीचशे महिने लाखो वाचकांच्या हृदयांत घर केलीली ऐतिहासिक कादंबरी.
मुंबई आकाशवाणीने केलेल्या सर्वेक्षणानुसार, मराठीतील गेल्या ५० वर्षांतील सर्वोत्कृष्ट १० पुस्तकांमध्ये समावेश. ३५ हून अधिक पुरस्कार! 30 वी. सचित्र आवृत्ती. कोल्हापूर येथील प्रसिद्ध चित्रकार संजय शेलार यांनी काढलेली २५ प्रसंगचित्रे व व्यक्तिचित्रांचा समावेश.
नवख्या लेखकाची सुरवातीची उतारी. जवळजवळ पाचशे पानांचा ऐवज वागवणारी ऐतिहासिक कादंबरी.अशा सर्व अशंकांवर या साहित्यकृतीच्या अंगभूत सामर्थ्यस्थळांनी मात केली. कुसुमाग्रज – वसंत कानेटकरांसारख्या दिग्गज साहित्यिकांपासून सामान्य वाचकांपर्यंत सा-यांनी या कादंबरीला प्रचंड प्रतिसाद दिला. अनेक पुरस्कार अन् सन्मानांनी ‘पानिपत’ गौरवली गेली. अन्य भाषांमध्ये अनुवादित झाली. नाट्यरुपाद्वारे रंगमंचावर आली. प्रतिभाशाली कादंबरीकार म्हणून विश्वास पाटील यांचं मानाचं पान शारदेच्या दरबारात मांडलं गेलं.
Jenna Moore –
Such a sad story..