Description
अतिसूक्ष्म रेणूपासून पृथ्वीच्या पाठीवर पसरलेल्या महासागरापर्यंत एकपेशीय अमीबापासून बुद्धिमान मनुष्यप्राण्यापर्यंत सर्वत्र संचार करणारं पाणी. या पाण्याची सांगोपांग ओळख म्हणजे हे पुस्तक. कारण हा प्रवास आहे पाण्याचे अनोखे पैलू उलगडणारा, पाण्यापासून सुरू होणारा आणि पाण्यातच विलीन होणारा!’पाणी’ हे जीवन आहे, हे सर्वांनाच माहीत आहे. पाणी व पृथ्वी विलग करता येत नाही. पाण्यामुळेच अवघी जीवनसृष्टी निर्माण झाली. विविध प्रकारचे सजीव जन्माला आले. मानव संस्कृती बहरली. तसेच पाण्यामुळे ती नाशही पावली. हे चक्र सातत्याने घडत असते. पाण्यावर जीवन अवलंबून असले तरी त्याचे वितरण मात्र विषम आहे. त्यामुळे जगात वैविध्यपूर्ण भौगोलिक स्थाने निर्माण झाली आहेत. ‘पाणी’ हे जीवन आहे, हे सर्वांनाच माहीत आहे. पाणी व पृथ्वी विलग करता येत नाही. पाण्यामुळेच अवघी जीवनसृष्टी निर्माण झाली. विविध प्रकारचे सजीव जन्माला आले. मानव संस्कृती बहरली. तसेच पाण्यामुळे ती नाशही पावली. हे चक्र सातत्याने घडत असते. पाण्यावर जीवन अवलंबून असले तरी त्याचे वितरण मात्र विषम आहे. त्यामुळे जगात वैविध्यपूर्ण भौगोलिक स्थाने निर्माण झाली आहेत.
Reviews
There are no reviews yet.