Description
“तुला प्रतीकात्मक सांगू का रजत, आपला मुक्काम सोडच, रस्तादेखील ठाऊक नसतो आपल्याला. आपण घर बंद करून जायला निघतो, सारी आवराआवर झालेली असते, काही घ्यायचं विसरलेलं नाही, अशीही जवळपास खात्री असते. कारण जे घेतलेलं नसतं, ते तसंच सोडून द्यायचं असतं. तरीही आपण एक शेवटची म्हणून चक्कर मारतो घरात. आवश्यक असं काही अगदी चुकून नाही ना राहिलेलं? नजरचुकीनं?’’आपण समजतो तसा आयुष्य म्हणजे नुसता काळाचा प्रवास नसतो. त्यात आपणही चालायचं असतं.गावा-देशांची, जाति-धर्मांची वेस ओलांडून माणसा-माणसांमधल्या नातेसंबंधांचा नेमक्या शब्दांत वेध घेणार्या सानियाच्या दीर्घकथा.
Reviews
There are no reviews yet.