Description
ही गोष्ट आहे एका अधोगतीची. ब्राऊन शुगरसारख्या जालीम व्यसनांच्या आहारी जाऊन रस्त्यावर आलेल्या एका व्यक्तीची. सुसंस्कारित आणि सुखवस्तू घरातला माणूस व्यसनांमुळे घरदार, नाती-गोती, सुख-समाधानच नव्हे; तर आपलं माणूसपणही कसं हरवून बसतो याची.
व्यसनाधीनता हा एक मनो-शारीरिक आजार आहे, हे आपल्याला ऐकून माहिती असतं.पण व्यसनांचा एकेक टप्पा ओलांडत माणूस त्यात गुरफटत जातो तेव्हा त्याचं नेमकं काय होतं याची कुणाला कल्पना असते? व्यसनं माणसाच्या शरीरावर, मनोबलावर कसा परिणाम करतात, आई-वडील अन् जीवलगांचं प्रेमही त्यांना मदतीचा हात का देऊ शकत नाही, आपलं चुकतं आहे हे कळत असूनही माणसं व्यसनांच्या गर्तेतून बाहेर का पडू शकत नाहीत, बाहेर पडली तरी पुन्हा पुन्हा त्याच दुष्टचक्रात का अडकत राहतात, अशा अनेक अवघड प्रश्नांची उत्तरं हे पुस्तक आपल्याला देतं.आपल्याला आजवर न दिसलेलं व्यसनाधीनतेचं अंधारं अधोजग तुषार नातू यांनी या नशायात्रेतून उलगडून दाखवलं आहे. पण त्याचबरोबर मनात जिद्द असेल तर या रसातळातून वर येत माणूस पुन्हा नव्याने आयुष्य सुरू करू शकतो, असा दुर्दम् विश्वासही त्यांनी या प्रांजळ अन् ह्रदस्पर्शी आत्मकथनातून दिला आहे.ही गोष्ट आहे एका अधोगतीची. ब्राऊन शुगरसारख्या जालीम व्यसनांच्या आहारी जाऊन रस्त्यावर आलेल्या एका तरुणाची.
Reviews
There are no reviews yet.