प्रत्येक लहान मुलात एक शास्त्रज्ञ दडलेला असतो. मुलांना सतत काहीतरी खटपट करण्याचा छंद असतो. त्यातल्या त्यात खेळणे म्हटले की, त्यांना अतिशय आनंद होतो. याच प्रवृत्तीचा उपयोग करून त्यांच्या ‘संशोधन बुद्धी’ला चालना मिळावी म्हणून खेळता-खेळता ज्ञान देणे असा उद्देश मनाशी बाळगून हे पुस्तक लिहिले आहे.
दैनंदिन जीवनात आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या घटना, दिसणाऱ्या वस्तू, विविध प्रकारची खेळणी याबद्दल लहान मुलांमध्ये कुतूहल असते. याच कुतूहलास प्रयोगाद्वारे दिशा देण्याचा प्रयत्न या पुस्तकात केला आहे. प्रयोगातून सर्जनशीलता व दृढ विश्वासाची निर्मिती होते. मुलांच्या मनातील शंकाकुशंका यांचेही समाधान होते आणि नवनिर्मितीला चालना मिळते.
यातील सर्व प्रयोग घरच्या घरी तयार करता येतील व आपल्या ज्यूनिअर सायंटिस्टला त्याच्या भविष्यातील वाटचालीस मदत करतील, हे मात्र नक्की.
Reviews
There are no reviews yet.