Description
रक्ताच्या नात्याचा संबंधदेखील उरला नाही, अशा घराच्या रगाड्याला जुंपलेली ती. सत्तर वर्षांची निपुत्रिक बालविधवा! उसन्या नातेवाइकांच्या मुला-बाळांना मायेच्या घट्ट धाग्यांनी जखडून ठेवणारी. वर्हाडच्या पाश्र्वभूमीवरची ही कादंबरी. शेतीला जखडलेल्या मध्यमवर्गीय कुटुंबाची ससेहोलपट, नव्या-जुन्या पिढ्यांमधली घुसमट, वंशसातत्याची सनातन आस, पुरुषी संस्कृतीने दाबून टाकलेल्या स्त्रिया, उच्च कुलीनतेचा टेंभा मिरवणार्या घराण्यामधली अज्ञात भयानक रहस्ये आणि आपल्या कर्तृत्वाने, निष्ठेने या घराण्याच्या परंपरा जपत त्यांना नवी वळणे देणारी ती वृद्धा.अखेर प्रत्येक घरातील कुलसंस्कृती, आचार-विचार, स्वयंपाक-संस्कृतीसुद्धा डोळ्यांत तेल घालून जतन करतात आणि त्यात भर घालतात त्या परक्या घरांतून आलेल्या स्त्रियाच ना!
Reviews
There are no reviews yet.